गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

गळफास लावून वृद्धाची आत्महत्या

Tuesday, 10th July 2018 12:57:27 AM

धानोरा, ता.१०: येथील इंदिरा नगरात राहणाऱ्या एका वृद्ध इसमाने आज सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास स्वत:च्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. रघुनाथ पांडुरंग मेश्राम(६५)असे मृत इसमाचे नाव आहे.

आज सकाळी भोजन केल्यानंतर रघुनाथ मेश्राम यांनी शेतावर जातो, असे घरच्यांना सांगितले. मात्र, जनावरांच्या गोठ्यात जाऊन त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली. श्री.मेश्राम हे लोहारकाम करायचे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुले, नातवंड असा परिवार आहे. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. धानोरा पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
EG43G
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना