शनिवार, 23 फेब्रुवारी 2019
लक्षवेधी :
  आरमोरी नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी भाजपचे हैदरभाई पंजवानी यांची बहुमताने निवड             दुसऱ्या दिवशीही पेंढरी येथे तालुका निर्मितीसाठी हजारो नागरिकांचे आंदोलन सुरुच             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
95%
नाही :
5%

नक्षल्यांनी केली इसमाची हत्या

Sunday, 8th July 2018 03:10:44 AM

गडचिरोली, ता.८: सशस्त्र नक्षल्यांनी काल(ता.७)रात्री पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन एका इसमाची हत्या केली. इसरु पोटावी, असे मृत इसमाचे नाव असून, तो एटापल्ली तालुक्यातील जारावंडी पोलिस ठाण्यांतर्गत सिनभट्टी येथील रहिवासी होता.

प्राथमिक माहितीनुसार, काल रात्री ११ वाजताच्या सुमारास १५ ते २० सशस्त्र नक्षली सिनभट्टी येथे गेले. त्यांनी इसरु पोटावी यास झोपेतून उठवून गावाबाहेर नेले. त्यानंतर गोळ्या घालून त्याची हत्या केली आणि रस्त्यावर त्याचा मृतदेह ठेवला. हे कृत्य कसनसूर दलमच्या नक्षल्यांनी केल्याचा अंदाज आहे. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे.

२२ एप्रिल रोजी पोलिसांनी कसनासूर येथील चकमकीत तब्बल ४० नक्षल्यांना कंठस्नान घातले होते. त्यानंतर सामान्य नागरिकाची नक्षल्यांनी हत्या करण्याची ही पहिलीच घटना आहे. याच महिन्यात २८ तारखेपासून नक्षल्यांचा शहीद सप्ताह आहे. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
CQ98Q
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना