गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

गडचिरोलीतील १४२ पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर

Saturday, 7th July 2018 07:30:55 AM

गडचिरोली, ता.७:उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गडचिरोली पोलिस दलातील १४२ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.

पोलिस महासंचालक कार्यालयाने गौरवास पात्र ठरलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची यादी जाहीर केली आहे. राज्यातील १४४ अधिकारी व कर्मचाऱ्यांना यंदा पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. त्यात गडचिरोली जिल्ह्यातील १४२ जणांचा समावेश आहे. त्यापैकी ६ उपविभागीय पोलिस अधिकारी, १ सहायक पोलिस निरीक्षक, ३५ पोलिस उपनिरीक्षक, ६ पोलिस हवालदार, २४ पोलिस नाईक व ७० पोलिस शिपायांना सन्मानित केले जाणार आहे. एवढ्या मोठ्या संख्येने जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे जिल्हा पोलिस दलाची मान उंचावली असून, पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी सन्मानचिन्ह जाहीर झालेले अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
8MG59
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना