शनिवार, 23 फेब्रुवारी 2019
लक्षवेधी :
  आरमोरी नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी भाजपचे हैदरभाई पंजवानी यांची बहुमताने निवड             दुसऱ्या दिवशीही पेंढरी येथे तालुका निर्मितीसाठी हजारो नागरिकांचे आंदोलन सुरुच             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
95%
नाही :
5%

जिल्हा नियोजन अधिकाऱ्यासह आदिवासी विकास विभागाच्या ८ अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल

Tuesday, 26th June 2018 11:27:06 AM

गडचिरोली, ता.२६: शासनाकडून सुमारे ४५ लाखांचे अनुदान लाटण्यासाठी आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांची संख्या जादा दाखवून शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १३ जणांवर गुन्हे दाखल केले आहे. त्यात आश्रमशाळांच्या चार संचालक व कर्मचाऱ्यांसह आदिवासी विकास विभागाचे ८ अधिकारी व गडचिरोलीच्या जिल्हा नियोजन अधिकाऱ्याचाही समावेश आहे. या कारवाईमुळे प्रशासनात एकच खळबळ माजली आहे.

श्रीकृष्ण रामदास मते, मुकेश श्रीकृष्ण मते, अमोल वसंतराव पंचबुद्धे, दामोधर रामदास हारगुडे, विजय भिमराव बेले(निवृत्त कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी), पुंडलिक नथ्थुजी रघुर्ते(निवृत्त सहायक प्रकल्प अधिकारी), तेजबहादूर श्रावण तिडके(जिल्हा नियोजन अधिकारी गडचिरोली),डी.एस.निवेकर(लेखाधिकारी, तपासणी पथक), राजेश भाऊदास मेश्राम(कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी आदिवासी विकास प्रकल्प नागपूर), नीलेश जयवंत राठोड(कनिष्ठ लिपिक), व्ही.वाय.भिवगडे(कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी गडचिरोली), हरिराम भानूजी मडावी(निवृत्त अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक)व रामदास कारुजी नंदेश्वर(आदिवासी विकास निरीक्षक, प्रकल्प कार्यालय अहेरी) अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत.

एसीबीने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, नागपूर जिल्ह्यातील हिंगणा येथील ग्रामोद्धार विद्याप्रसारक शिक्षण संस्थेचे सचिव श्रीकृष्ण मते, अहिल्यादेवी होळकर अनुदानित आदिवासी आश्रमशाळा उखळी येथील प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक दामोधर हारगुडे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक अमोल पंचबुद्धे, कनिष्ठ लिपिक मुकेश मते यांनी २०१० ते २०१६ या कालावधीत भेट देणाऱ्या उपरोक्त अधिकाऱ्यांशी संगनमत करुन कागदोपत्री आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची संख्या जादा दाखवून सुमारे ४४ लाख ९९ हजार ६१३ रुपयांचे जादा अनुदान प्राप्त केले.

शाळा प्रशासनाने विद्यार्थी संख्येत फुगवटा दाखविण्याकरिता दस्तऐवजांचे बनावटीकरण केले आहे. आश्रमशाळेत कुठलाही गैरव्यवहार होणार नाही व शासकीय अनुदानाचा गैरवापर होणार नाही, याकरिता नियुक्त असलेल्या उपरोक्त सर्व अधिकाऱ्यांनी डोळेझाक करुन शाळेत उपलब्ध बनावट दस्तऐवजांची शहानिशा न करता, तसेच शाळा प्रशासनाद्वारे दाखविण्यात येणाऱ्या बनावट विद्यार्थ्यांबाबत शासनास अवगत न करता आश्रमशाळा प्रशासनाशी हातमिळवणी करुन अहिल्यादेवी होळकर अनुदानित आदिवासी आश्रमशाळेस अतिरिक्त अनुदान मिळण्याकरिता मदत केल्याची खात्रीशिररित्या कागदोपत्री उघड झाल्याचे एसीबीने म्हटले आहे.

तसचे ग्रामोद्धार विद्याप्रसारक शिक्षण संस्थेचे सचिव श्रीकृष्ण मते यांनी त्यांचा पुत्र मुकेश मते याची आपल्या शाळेत कनिष्ठ लिपिक म्हणून नियुक्ती करताना गैरप्रकार केला. मुकेश मते याची जन्मतारीख ८ नोव्हेंबर १९८९ ही असताना श्रीकृष्ण मते यांनी ती ८ नोव्हेंबर १९८७ अशी दाखवून त्याची कायमस्वरुपी नियुकती केली. यामुळे मुकेश मते यास अवैध मार्गाने १६ लाख ५२ हजार ९१९ रुपयांचा लाभ मिळाला व शासनाचे नुकसान झाले. अशाप्रकारे शासनाचे एकूण ६१ लाख ५२ हजार ५३२ रुपयांचे नुकसान झाल्याने उपरोक्त १३ जणांवर एसीबीने हिंगणा पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम १३(१)(क)(ड), सहकलम१३(२), तसेच कलम ४२०, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हे दाखल केल्याची माहिती एसीबीने दिली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपायुक्त पी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक विजय माहुरकर, पोलिस निरीक्षक शुभांगी देशमुख, शिपाई दिप्ती मोटघरे यांनी ही कारवाई केली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
NR76X
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना