मंगळवार, 11 डिसेंबर 2018
लक्षवेधी :
  ब्रम्हपुरी नगर परिषदेत काँग्रेसची एकहाती सत्ता, नगराध्यक्ष रिता उराडे यांच्यासह काँग्रेसचे ११ सदस्य विजयी, अशोक भैया यांच्या आघाडीला ५, तर भाजपला ३ जागा             नक्षल्यांनी केली इसमाची हत्या-कुरखेडा तालुक्यातील खोब्रामेंढा येथील घटना             तेली समाजातील मुलांनी उच्च शिक्षण घ्यावे- संत जगनाडे महाराज जयंती कार्यक्रमात प्रा.देवानंद कामडी यांचे आवाहन             गडचिरोली येथील क्रिकेट सामन्यात पत्रकारसंघाची व्यापारीसंघावर १२ धावांनी मात             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
95%
नाही :
5%

पोलिस अधिकारी, जवानांनी गिरविले योगासनाचे धडे

Thursday, 21st June 2018 02:57:48 PM

गडचिरोली, ता.२१: जागतिक योग दिनाचे औचित्य साधून आज पोलिस दलाच्या वतीने पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर योग अभ्यासाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलिस अधिकारी व शेकडो जवानांनी योगासनाचे धडे गिरविले.

योग प्रशिक्षक संजय देशमुख, वर्षा देशमुख व अथर्व गोहणे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी योगासनांचा अभ्यास केला.

पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी अपर पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, हरी बालाजी, उपविभागीय पोलिस अधिकारी समीरसिंह साळवे उपस्थित होते. या अभ्यासात पोलिस दलातील २० अधिकारी व ४५० जवान आणि कर्मचाऱ्यांनी सहभागी होऊन योगासनाचे धडे गिरविले. यावेळी वर्षा देशमुख यांनी योग दिनाचे महत्त्व विशद केले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
04DVE
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना