रविवार, 22 जुलै 2018
लक्षवेधी :
  रोहयोचे १८ कोटी रुपये तत्काळ द्या:आ.डॉ.देवराव होळी यांची विधानसभेत मागणी             अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा-गडचिरोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचा निवाडा             पहिल्‍याच पावसात वाहून गेला चिरचाडी येथील कोल्हापुरी बंधारा, निकृष्ट बांधकामाचा परिणाम             नागपूर व गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात फ्लॅटस्, प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ७९७२८८०५१३           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
96%
नाही :
4%

गोशाळेला मदत करुन शिवसैनिकांनी साजरा केला आदित्य ठाकरेंचा वाढदिवस

Thursday, 14th June 2018 07:46:36 AM

गडचिरोली, ता.१४: फळे वाटप, बिस्कीट वाटप अशा प्रसिद्धीलोलुप पद्धतींना फाटा देत येथील शिवसैनिकांनी उपजिल्हाप्रमुख अरविंद कात्रटवार यांच्या नेतृत्वात गोशाळेला मदत करुन पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस साजरा केला.

काल(ता.१३)शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस होता. यानिमित्त शिवसेनेचे संपर्क प्रमुख किशोर पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटवार यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी हळदा येथील गोविंद गोशाळेला भेट दिली. यावेळी कात्रटवार यांनी गो रक्षणाच्या पवित्र कार्याला १० हजार रुपयाची मदत दिली. यावेळी त्यांनी गो मातेचे पूजन करून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या कार्याला गो माता मोठे यश प्राप्त करून देवो, अशी प्रार्थना केली. 

हिंदू धर्मात गायीचे स्थान अतिशय महत्वाचे आहे. त्यामुळे या गोशाळेत समाज कंटंकांकडून कत्तलीसाठी नेणाऱ्या गायी हस्तगत करून त्यांची सेवा करण्यात येते. तसेच दान केलेल्या गायींचेसुद्धा गोशाळेत संगोपन करण्यात येते, अशी माहिती गोशाळेच्या स्वयंसेवकांनी दिली. 

याप्रसंगी शिवसेना उपतालुका प्रमुख यादव लोहबरे, योगेश कुड़वे, सुनील नक्षिणे, नीळकंठ मेश्राम, संजय बोबटे, संतोष मेश्राम, भास्कर सोरते, शामराव कुकुड़कर, दिलीप मेश्राम, अजिंक्य जुमनाके, श्रीकांत लेनगुरे, जितू नेताम, जीवन चापड़े, गुणवंत खोब्रागडे, गणेश दहेलकर, राहुल सोरते उपस्थित होते. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
42Z64
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना