मंगळवार, 21 ऑगस्ट 2018
लक्षवेधी :
  दुसऱ्या दिवशीही पर्लकोटा नदीच्या पुलावर पाणी, भामरागड तालुक्यातील गावांचा संपर्क तुटलेलाच             पुरात कारसह अडकलेल्या दोघांची सहिसलामत सुटका-गडचिरोली तालुक्यातील गुरवळा येथील घटना             गोसेखुर्द धरणाचे १० दरवाजे दीड मीटरने, तर २३ दरवाजे १ मीटरने उघडले, ७९५४ क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग             हैदराबाद-गडचिरोली बस नाल्यात कोसळली,आलापल्ली-सिरोंचा मार्गावरील नंदीगावनजीकची घटना, प्रवासी सुरक्षित             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
96%
नाही :
4%

...अन् करपड्याच्या जंगलात वन्य प्राण्यांसाठी सुरु झाली अनोखी पाणपोई!

Thursday, 17th May 2018 08:54:01 AM

वैरागड,ता.१७: कडक उन्हाळा लागला की, वन्यप्राण्यांचे हाल होतात. पाण्यासाठी भटकता-भटकता ते शिकाऱ्यांच्या जाळ्यात अडकतात. हीच बाब हेरुन सामाजिक कार्यकर्ते बलराम सोमनानी यांच्या पुढाकाराने करपडा येथील युवकांनी एक अनोखी पाणपोई सुरु केली आहे. ही पाणपोई वन्यप्राण्यांसाठी जीवदान देणारी ठरत आहे.

त्याचे झाले असे की, सामाजिक कार्यकर्ते बलराम सोमनानी हे दोन-चार दिवसांपूर्वी संध्याकाळच्या सुमारास करपडा येथे गेले असता त्यांना काही जंगली श्वापदे पाण्याच्या शोधार्थ गावाकडे येताना दिसले. हे प्राणी गावात आले, तर शिकारी त्यांना सोडणार नाही आणि नाहक मुक्या प्राण्यांना जीव गमवावा लागेल, हे सोमनानी यांच्या लक्षात आले. प्राण्यांचे हाल बघून सोमनानी यांचा जीव व्याकूळ झाला. लागलीच त्यांनी ही बाब करपडा येथील सामाजिक कार्यकर्ते रामदास डोंगरवार यांच्या कानावर घातली. डोंगरवार यांनी करपडा येथील तपस्या युवा मंडळाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जंगलात खड्डा तयार केला. त्यावर प्लॉस्टिकचे आच्छादन घालून सुमारे चार हजार लीटर पाणी उपलब्ध करुन दिले. आता चितळ, हरीण, सांबर, रानडुकरे व अन्य प्राणी याच खड्ड्यातील पाण्याद्वारे आपली तृष्णा भागवतात. 

माणसांसाठी पाणपोई सुरु करणारे अनेक जण आहेत. पण, मुक्या प्राण्यांची तहान कोण भागवणार, या प्रश्नाने मला अस्वस्थ करुन सोडले. म्हणून आपण ही पाणपोई सुरु केल्याचे सोमनानी यांनी सांगितले. आता वनविभागाचे कर्मचारी व गावकऱ्यांनी या पाणपोईची नियमित देखभाल करावी, अशी अपेक्षा श्री.सोमनानी यांनी व्यक्त केली.

या पाणपोईसाठी भोलू सोमनानी, रामदास डोंगरवार, कविश्वर खोब्रागडे, लोमेश वाकडे, रोशन पावले, हेमंत सहारे, सुनील ताडाम, रवींद्र डोंगरवार, आकाश रणदिवे, शंकर चुधरी, पराग पिंपळे, सुरेश तुमरेटी, अमोल धारणे, दयाराम डोंगरवार, बंटी पावले, मनोज पावले, किरण मडावी, संजय गावळे, नामदेव ठाकूर, सचिन वाकडे, धनराज ठाकूर, राजेंद्र तुमरेटी, चरण ठाकूर यांच्यासह वनपरिक्षेत्राधिकारी श्री.चांगले, क्षेत्रसहायक ताजने, मेश्राम व त्यांच्या सहकाऱ्यांनी सहकार्य केले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
0G6DX
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना