शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या दोघांना २० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा

Wednesday, 9th May 2018 07:36:36 AM

गडचिरोली, ता.९: घराची चावी शोधण्याचा बहाणा करुन अल्पवयीन मुलीला घरी बोलावून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या दोन आरोपींना येथील विशेष सत्र न्यायालयाने २० वर्षांचा सश्रम कारावास व २० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. विनोद बंडू गेडाम(२०)व गोविंदा बोरा पुंगाटी(२२) दोघेही रा.धोडराज, ता.भामरागड अशी आरोपींची नावे आहेत.

४ मार्च २०१७ ची ही घटना आहे. या दिवशी रात्री ८ ते ९ वाजताच्या सुमारास पीडित अल्पवयीन मुलगी गावातील ग्रामपंचायतीसमोर नृत्याचा कार्यक्रम पाहत असताना विनोद गेडाम तेथे गेला. त्याने गोविंदा पुंगाटी हा घराची चावी शोधून मागत असल्याचे सांगून तिला घरी बोलावले. पीडित मुलगी चावी शोधत असताना विनोद गेडाम याने पीडित मुलीला पकडून तिचे तोंड दाबले आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर गोविंदा पुंगाटी यानेही तिच्यावर बलात्कार केला. मात्र पीडित मुलीने आरडाओरड केली असता दोघेही तेथून पळून गेले. त्यानंतर पीडित मुलीने आपल्या बहिणीकडे जाऊन तिला आपबिती सांगितली. बहिणीने ही घटना तिच्या आईवडिलांना सांगितली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ५ मार्च रोजी पीडितेच्या वडिलांनी भामरागड पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यावरुन पोलिसांनी आरोपी विनोद गेडाम व गोविंदा पुंगाटी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक केली. तपास पूर्ण झाल्यावर पोलिस उपनिरीक्षक रविकिरण कदम यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

आज या प्रकरणाचा निकाल लागला. विशेष सत्र न्यायालयाने साक्ष पुरावा तपासून व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपी विनोद गेडाम व गोविंदा पुंगाटी यांना भादंवि कलम ३६६ व ३६३ अन्वये प्रत्येकी ७ वर्षांचा सश्रम कारावास व २ हजार रुपये दंड, तसेच भादंवि कलम ३७६ ड अन्वये प्रत्येकी २० वर्षांचा सश्रम कारावास व प्रत्येकी ८ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अनिल प्रधान यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलिस निरीक्षक प्रफुल्ल कदम यांनी जबाबदारी सांभाळली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
NK80I
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना