शनिवार, 20 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

गोविंदराव मुनघाटे महाविद्यालयाला राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार जाहीर

Wednesday, 18th April 2018 06:48:29 AM

गडचिरोली, ता.१८: व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात मौलिक कार्य करुन समाजासमोर आदर्श ठरल्याबद्दल कुरखेडा येथील गोविंदराव मुनघाटे महाविद्यालयाला प्रतिष्ठेचा राज्य शासनाचा राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार जाहीर झाला आहे. 

राज्य घटनेतील अनुच्छेद ४७ मधील मार्गदर्शक तत्त्वानुसार १७ ऑगस्ट २०११ च्या निर्णयान्वये राज्याचे व्यसनमुक्तीचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. या धोरणांतर्गत शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने व्यसनमुक्ती क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या व समाजासमोर आदर्श ठरलेल्या व्यक्ती व संस्थांना व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार देण्याची योजना १९९८-९९ पासून सुरु केली आहे. या योजनेंतर्गत २०१७-१८ या वर्षासाठी कुरखेडा येथील श्री.गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयाची राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. राज्यातील ११ संस्थांची या पुरस्कारासाठी निवड झाली असून, पुरस्कारप्राप्त संस्थांमध्ये श्री.गोविंदराव मुनघाटे महाविद्यालय हे विदर्भातील एकमेव महाविद्यालय आहे. शिक्षण, साहित्य, कला व सांस्कृतिक क्षेत्रात दरवर्षी अभिनव उपक्रम राबविणारे हे महाविद्यालय पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री.गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन होत आहे.

शिवाय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कारासाठी राज्यातील ४० व्यक्तींची निवड करण्यात आली आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
8FW4E
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना