गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

वैशाली बांबोळे राज्यस्तरीय आदर्श समुपदेशिका पुरस्काराने सन्मानित

Wednesday, 11th April 2018 04:53:46 AM

गडचिरोली, ता.११: येथील पोलिस ठाण्यात समुपदेशिका पदावर कार्यरत वैशाली बांबोळे(गेडाम)यांना नुकतेच कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

वैशाली बांबोळे ह्या गडचिरोली तालुक्यातील येवली येथील मूळ रहिवासी असून, त्यांनी समाजकार्य विषयात पदव्युतर शिक्षण घेतले आहे. सध्या त्या गडचिरोली पोलिस ठाण्यात समुपदेशिका पदावर कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या कार्यकाळात महिलांवरील अन्याय, अत्याचाराची दीड हजारांहून अधिक प्रकरणे यशस्वीरित्या हाताळली आहेत. या कार्याची दखल घेत गडहिंग्लज येथील कार्यक्रमात त्यांना आदर्श समुपदेशिका पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 

या पुरस्काराबद्दल संरक्षण अधिकारी श्री.माहा, पोलिस उपनिरीक्षक वर्षा नैताम, भारतीय मानवाधिकार परिषदेचे प्रांताध्यक्ष गजेंद्र डोमळे, संघपाल गेडाम, अमोल किरमिजवार व चाहत्यांनी वैशाली बांबोळे यांचे अभिनंदन केले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
544RS
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना