मंगळवार, 21 ऑगस्ट 2018
लक्षवेधी :
  दुसऱ्या दिवशीही पर्लकोटा नदीच्या पुलावर पाणी, भामरागड तालुक्यातील गावांचा संपर्क तुटलेलाच             पुरात कारसह अडकलेल्या दोघांची सहिसलामत सुटका-गडचिरोली तालुक्यातील गुरवळा येथील घटना             गोसेखुर्द धरणाचे १० दरवाजे दीड मीटरने, तर २३ दरवाजे १ मीटरने उघडले, ७९५४ क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग             हैदराबाद-गडचिरोली बस नाल्यात कोसळली,आलापल्ली-सिरोंचा मार्गावरील नंदीगावनजीकची घटना, प्रवासी सुरक्षित             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
96%
नाही :
4%

नक्षल्यांनी केली इसमाची हत्या

Tuesday, 13th March 2018 12:11:50 PM

गडचिरोली, ता.१३: पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी आज सकाळी धानोरा तालुक्यातील कटेझरी येथील एका इसमाची हत्या केली. दुर्गराम कोल्हा(५०) असे मृत इसमाचे नाव आहे.

प्राथमिक माहितीनुसार, पुढील महिन्याच्या अखेरीस तेंदू हंगामाला सुरुवात होणार असल्याने सध्या बेलकटाईचे काम सुरु आहे. कटेझरी येथील काही मजूर आज जंगलात बेलकटाईच्या कामावर गेले होते. त्यात दुर्गराम कोल्हाचाही समावेश होता. आज सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास १० ते १२ सशस्त्र नक्षलवादी मजुरांजवळ गेले. त्यांनी दुर्गराम कोल्हा यास आपल्यासोबत नेले व नंतर त्याची तीक्ष्ण अवजाराने हत्या करुन मृतदेह कटेझरी-देवसूर रस्त्यावर ठेवला. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.  

कटेझरी व परिसरातील गावे नक्षलग्रस्त आहेत. मात्र कटेझरी येथे दीड वर्षापूर्वी पोलिस मदत केंद्र सुरु करण्यात आल्याने नक्षल कारवायांना बऱ्याच प्रमाणात आळा बसला होता. परंतु अलिकडच्या काळात या भागात नक्षल कारवायांनी जोर धरल्याचे दिसून येत आहे. आठ दिवसांपूर्वीच कटेझरीनजीकच्या भटमऱ्यान येथील एका कुटुंबाला नक्षली दहशतीमुळे गाव सोडावे लागले, तर आज एका नागरिकाला जीव गमवावा लागला.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
9Z514
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना