गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

खा.पूनम महाजन यांच्या शेतकरीविरोधी वक्तव्याचा शेकापने केला निषेध

Monday, 12th March 2018 06:29:05 AM

गडचिरोली, ता.१२:  विविध न्याय्य मागण्यांसाठी लाखो शेतकऱ्यांनी विधिमंडळावर मोर्चा काढला आहे. या मोर्चेकरु शेतकऱ्यांना शहरी नक्षलवादी संबोधणाऱ्या भाजपच्या खासदार पूनम महाजन यांचा शेतकरी कामगार पक्षाच्या गडचिरोली जिल्हा शाखेने तीव्र निषेध केला आहे.

शेकापचे जिल्हा निमंत्रक रामदास जराते यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वात लाखो शेतकऱ्यांनी मंत्रालयावर लॉगमार्च काढला आहे. बळजबरीने केले जाणारे भूसंपादन थांबवा, वनजमिनीचे ७/१२ वाटप करा आदी मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी लाखो शेतकऱ्यांनी मंत्रालयावर धडक दिली. दरम्यान भाजपाच्या खासदार पूनम महाजन यांनी या लॉगमार्चमध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्‍यांना शहरी नक्षलवादी संबोधून शेतकऱ्यांचा अपमान केला. आपले संविधानिक हक्क व अधिकारासाठी शेकडो किलोमीटर पायी चालत जाऊन सरकारला जाब विचारणाऱ्या शेतकऱ्यांना नक्षलवादी संबोधून अपमान करणाऱ्या पूनम महाजन यांच्यासारख्या भांडवलदारांच्या बाहूल्यांचा भारतीय शेतकरी कामगार पक्ष निषेध करीत असल्याचे पक्षाचे जिल्हा शाखेचे निमंत्रक रामदास जराते यांनी म्हटले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
55KKU
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना