बुधवार, 24 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

सशस्त्र नक्षल्यांनी लाकूड डेपो पेटवला

Monday, 12th March 2018 06:42:03 AM

गडचिरोली, ता.१२: जल, जंगल व जमिनीवर स्थानिकांचा अधिकार असून वनविभागाने वृक्षतोड करु नये, असे फर्मान सोडत आज सशस्त्र नक्षल्यांनी अहेरी तालुक्यातील तलवाडा येथील लाकूड आगारातील लाकडांना आग लावली. ही घटना आज पहाटे घडली.

आलापल्ली वनपरिक्षेत्रांतर्गत तलवाडा येथील कक्ष क्रमांक ६६ मध्ये कूपकटाई सुरु असून, तोडलेल्या झाडांचे बिट रचण्यात येत आहेत. काम सुरु असताना आज पहाटे साडेपाच ते सहा वाजताच्या सुमारास १० ते १५ सशस्त्र नक्षली तेथे गेले. त्यांनी सुमारे १० ते १५ बिटातील लाकडांना आग लावली. मात्र, लाकडे ओली असल्याने खूप जळाली नाहीत. तरीही वनविभागाचे सुमारे २ लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आग लावल्यानंतर नक्षल्यांनी मजुरांना वनविभागाचे काम न करण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी एक बॅनर बांधून पत्रकेही टाकली. 

पोलिस आणि वन विभागाच्या कामांवर बहिष्कार घाला, लाकूड बिट, बांबू काढणे बंद करा, वनकर्मचाऱ्यांनी जंगलात प्रवेश करु नये,जल, जंगल व जमिनीवर आदिवासीचा अधिकार असून, ग्रामसभांच्या परवानगीशिवाय नैसर्गिक संपत्तीला हात लावू नका, अशा आशयाचा मजकूर बॅनर व पत्रकांवर आहे. भाकपा माओवादी पेरमिली एरिया कमिटीने हे पत्रक काढले आहे.  घटनेची माहिती मिळताच वनाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
0UH4K
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना