सोमवार, 23 जुलै 2018
लक्षवेधी :
  माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या दुधबळे यांचे दीर्घ आजाराने निधन             रोहयोचे १८ कोटी रुपये तत्काळ द्या:आ.डॉ.देवराव होळी यांची विधानसभेत मागणी             अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा-गडचिरोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचा निवाडा             पहिल्‍याच पावसात वाहून गेला चिरचाडी येथील कोल्हापुरी बंधारा, निकृष्ट बांधकामाचा परिणाम             नागपूर व गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात फ्लॅटस्, प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ७९७२८८०५१३           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
96%
नाही :
4%

खंडणीच्या गुन्ह्यात युवक काँग्रेसच्या लोकसभा सचिवासह भ्रष्टाचार निवारण समितीच्या तिघांना अटक

Thursday, 8th March 2018 02:16:20 PM

गडचिरोली, ता.८: रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचालकाला धमकावून त्याला १ लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी, तसेच एका दारुविक्रेत्याच्या घराची नासधूस करुन त्यालाही रकमेची मागणी केल्याप्रकरणी चामोर्शी पोलिसांनी भ्रष्टाचार निवारण समितीचा जिल्हाध्यक्ष तथा युवक काँग्रेसचा लोकसभा सचिव कुणाल पेंदोरकर याच्यासह पाच जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. कुणाल पेंदोरकर रा.गडचिरोली, विवेक बारसिंगे रा. विवेकनगर चंद्रपूर, पंकज प्रदीप बारसिंगे रा.सुभाष वॉर्ड गडचिरोली अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून, अन्य दोन आरोपी आरिफ पीरमोहम्मद कनोजे व मदन दयाल मडावी यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. आरिफ कनोजे हादेखील काँग्रेसचा कार्यकर्ता आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चामोर्शी तालुक्यातील दहेगाव येथील रुपेश रामदास चलाख यांच्या घरी शौचालयाचे बांधकाम सुरु असल्याने त्यांनी विनोद चुनारकर यास ट्रॅक्टर घेऊन रेती आणण्यासाठी एकोडी नदीघाटावर पाठविले. रेती भरुन परत येत असताना उपरोक्त पाचही आरोपींनी ट्रॅक्टर अडवून धमकावले व १ लाख रुपयांची मागणी केली. माहिती मिळताच रुपेश चलाख यांनी घटनास्थळ गाठले असताना त्यांनाही धमकावून मारहाण केली व १० हजार रुपये खिशातून काढून घेतले. यासंबंधी चलाख यांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी उपरोक्त आरोपींवर भादंवि कलम ३९५ व ५०६ अन्वये गुन्हे दाखल केले. त्यातील कुणाल पेंदोरकर,विवेक बारसिंगे, पंकज प्रदीप बारसिंगे यांना अटक करण्यात आली, तर आरिफ पीरमोहम्मद कनोजे व मदन दयाल मडावी यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. न्यायालयाने अटक केलेल्या आरोपींना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

हेच आरोपी सगणापूर येथील विनोद येग्लोपवार यांच्या घरी गेले होते. त्याला दारु विक्री करीत असल्याबाबत धमकावून त्याच्या घरातील सामानाची नासधूस केली आणि भ्रष्टाचार निवारण समितीचा मोठा कार्यक्रम असल्याचे सांगून ३० हजार रुपयांची मागणी केली होती. त्यामुळे येग्लोपवार यांनीही पोलिसांत तक्रार केली. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपींवर भादंवि कलम ३८४, ४४८, ५०६, ३४ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. पोलिस निरीक्षक गोरख गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मल्हार थोरात, निशा खोब्रागडे, सहायक फौजदार कुंजनसिंह बघेल, हवालदार राजू उराडे, हवालदार चंद्रशेखर काकडे, सुनील हजारे, नजीर पठाण, धर्मा सिडाम, मनिषा हुलके करीत आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
XBAV1
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना