रविवार, 22 जुलै 2018
लक्षवेधी :
  रोहयोचे १८ कोटी रुपये तत्काळ द्या:आ.डॉ.देवराव होळी यांची विधानसभेत मागणी             अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा-गडचिरोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचा निवाडा             पहिल्‍याच पावसात वाहून गेला चिरचाडी येथील कोल्हापुरी बंधारा, निकृष्ट बांधकामाचा परिणाम             नागपूर व गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात फ्लॅटस्, प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ७९७२८८०५१३           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
96%
नाही :
4%

शेकडो कंत्राटी कर्मचारी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर

Tuesday, 6th March 2018 01:37:41 PM

गडचिरोली, ता.६: कंत्राटी कर्मचारी व अधिकाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करावे, ९ फेब्रुवारीचे परिपत्रक रद्द करावे या व अन्य मागण्यांसाठी आज राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

कंत्राटी कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष वकील खेडकर, सचिव प्रशांत बांबोळे यांच्या नेतृत्वात दुपारी साडेबारा वाजता इंदिरा गांधी चौकातून मोर्चास प्रारंभ झाला. नोकरीत कायम करा, ९ फेब्रुवारी २०१८ चे परिपत्रक रद्‌द करा अशी विधाने असणाऱ्या टोप्या घालून कंत्राटी कर्मचाऱ्यांनी शासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. या मोर्चात जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत एनआरएचएम, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, शिक्षण विभाग तसेच अन्य अशा १९ विभागातील स्त्री व पुरुष कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मुख्य मार्गाने शांततेत मोर्चेकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचले. तेथे मोर्चाचे जाहीर सभेत रुपांतर झाले. यावेळी भारिप बहुजन महासंघाचे नेते रोहिदास राऊत, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, प्राथमिक शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष विजय साळवे, ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कविश्वर बनपूरकर, प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कावडकर, जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष एस.वाय.खरवडे यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देऊन संबोधित केले.

कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत असून, शासनाने योग्य निर्णय घेतला नाही तर तीव्र आंदोलन करु, असा इशारा यावेळी देण्यात आला. त्यानंतर मोर्चेकऱ्यांनी धरणे आंदोलन करुन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. 

विशेष म्हणजे, शेकडो कंत्राटी कर्मचारी या मोर्चात सहभागी झाल्याने आज विविध विभागांची कार्यालये ओस पडली होती. शिवाय कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे कामकाज प्रभावीत झाले होते.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
6W558
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना