सोमवार, 23 जुलै 2018
लक्षवेधी :
  माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या दुधबळे यांचे दीर्घ आजाराने निधन             रोहयोचे १८ कोटी रुपये तत्काळ द्या:आ.डॉ.देवराव होळी यांची विधानसभेत मागणी             अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा-गडचिरोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचा निवाडा             पहिल्‍याच पावसात वाहून गेला चिरचाडी येथील कोल्हापुरी बंधारा, निकृष्ट बांधकामाचा परिणाम             नागपूर व गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात फ्लॅटस्, प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ७९७२८८०५१३           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
96%
नाही :
4%

भर बाजारात पोलिस जवानावर नक्षल्यांचा हल्ला

Sunday, 4th March 2018 02:05:37 PM

गडचिरोली, ता.४: भर बाजारात नक्षल्यांनी बंदोबस्तावर असलेल्या पोलिस जवानावर हल्ला चढविला. या हल्ल्यात पोलिस जवान किरकोळ जखमी झाला. ही घटना आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास एटापल्ली तालुक्यातील गट्टा(जांभिया) येथील आठवडी बाजारात घडली. गोंजी मट्टामी असे जखमी जवानाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोंजी मट्टामी हे सी-६० पथकात कार्यरत असून, आज गट्टा येथील आठवडी बाजारात तैनात होते. दुपारी ३ वाजताच्या सुमारास दोन-तीन साध्या वेशभूषेतील नक्षली गोंजी मट्टामी यांच्या जवळ आले. त्यांनी मट्टामी यांच्याकडील एके-४७ ही बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र मट्टामी यांनी प्रसंगावधान राखत नक्षल्यांवर जोरदार हल्ला चढविला. यावेळी नक्षल्यांनी त्यांच्याकडील पिस्टल मट्टामी यांच्या दिशने रोखली. परंतु मट्टामी यांनी पिस्टल हिसकावली. त्यानंतर दुसऱ्या नक्षल्याने त्याच्याकडील चाकू मट्टामी यांच्या छातीच्या खालच्या बाजूला मारला. तरीही न डगनगता मट्टामी यांनी प्रतिकार सुरुच ठेवला. हल्ला झाल्याचे लक्षात येताच बंदोबस्तावर असलेले अन्य पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी धावून आले. तोपर्यंत नक्षल्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला होता. सी-६० पथकाच्या जवानांनी त्यांचा पाठलाग केला. परंतु नक्षली घनदाट जंगलात पसार झाले. गोंजी मट्टामी यांना तातडीने नागपूरला हलविण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. मट्टामी यांच्या प्रसंगावधनामुळे नक्षल्यांकडील पिस्टल व १० काडतुसे पोलिसांच्या हाती लागली आहेत. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
9O85S
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना