गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

छत्तीसगड-तेलंगणाच्या सीमेवर १० नक्षलवादी ठार

Friday, 2nd March 2018 06:12:44 AM

गडचिरोली, ता.२: छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत १० नक्षलवादी ठार झाले असून, ३ जवान जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते.    

एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगड व तेलंगणा पोलिस संयुक्तपणे नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना आज सकाळी तेलंगणा सीमेवराल पुजारी कांकेरी जंगलात नक्षलवादी व पोलिसांमध्ये चकमक झाली. या चकमकीत नक्षल्यांचा नेता हरिभूषण व अन्य प्रमुख नेते ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे.  ग्रेहाउंडसच्या पथकाने केलेली ही कारवाई अजूनही सुरु आहे. माओवादी नेता हरिभूषण हा या चकमकीत ठार झाला आहे. ठार झालेल्या नक्षल्यांमध्ये ६ महिलांचाही समावेश असून, तीन जवानही जखमी झाल्याचे समजते. या जवानांना हेलिकॉप्टरने भद्राचलम येथे उपचारांसाठी हलवण्यात आले आहे 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
WB0X3
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना