सोमवार, 23 जुलै 2018
लक्षवेधी :
  माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या दुधबळे यांचे दीर्घ आजाराने निधन             रोहयोचे १८ कोटी रुपये तत्काळ द्या:आ.डॉ.देवराव होळी यांची विधानसभेत मागणी             अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा-गडचिरोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचा निवाडा             पहिल्‍याच पावसात वाहून गेला चिरचाडी येथील कोल्हापुरी बंधारा, निकृष्ट बांधकामाचा परिणाम             नागपूर व गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात फ्लॅटस्, प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ७९७२८८०५१३           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
96%
नाही :
4%

भंडाऱ्याचे माजी खासदार नाना पटोले यांची प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती

Thursday, 22nd February 2018 02:30:01 PM

गडचिरोली, ता.२२: ओबीसी व शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत पंतप्रधानांवर तोंडसुख घेत भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देणारे भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार नाना पटोले यांची आज काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी पटोलेंच्या नियुक्तीचे पत्र आज जारी केले. नाना पटोले यांना प्रदेश उपाध्यक्ष व निवृत्ती सनदी अधिकारी भाई नगराळे यांना प्रदेश सरचिटणीस बनविण्यात आले आहे.

शेतकरी व ओबीसींच्या प्रश्नांवर पंतप्रधान बोलू देत नाही, अशी टीका करुन नाना पटोले यांनी ८ डिसेंबर २०१७ खासदारकीचा राजीनामा दिला व नंतर तो मंजूरही करण्यात आला. त्यानंतर ४ जानेवारी २०१८ रोजी त्यांनी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांची नवी दिल्लीत भेट घेऊन घरवापसी करीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. परंतु ते काँग्रेसच्या मंचावर जाहीरपणे जात नव्हते. दरम्यानच्या काळात विविध सभा व मेळाव्यांच्या माध्यमातून त्यांनी भाजप व पंतप्रधानांवर टीकेची झोड उठविण्याची एकही संधी सोडली नाही. अखेर आज काँग्रेसने त्यांच्या प्रदेश उपाध्यक्षपदाच्या नियुक्तीची घोषणा केली. 

नाना पटोले यांच्याशिवाय राज्याचे निवृत्त सनदी अधिकारी भाई नगराळे यांना पक्षाचे राज्य सरचिटणीस बनविण्यात आले आहे.

भाई नगराळे यांनी राज्य शासनाचे सचिव म्हणून काम केले असून, सध्या ते राज्य स्काऊट व गाईडचे आयुक्त आहेत. दरम्यान, १५ दिवसांपूर्वीच निवृत्त सनदी अधिकारी उत्तमराव खोब्रागडे व किशोर गजभिये यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पक्ष आता या दोघांकडे कोणती जबाबदारी देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पक्षाचे प्रदेश सचिव रवींद्र दरेकर यांनी नाना पटोले व भाई नगराळे यांच्या नियुक्तीबद्दल अभिनंदन केले आहे. १६ मार्चपासून नवी दिल्लीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अधिवेशन होणार असून, त्यात उर्वरित नियुक्त्या केल्या जाऊ शकतात, अशी माहिती श्री.दरेकर यांनी दिली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
1STA8
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना