शनिवार, 23 फेब्रुवारी 2019
लक्षवेधी :
  आरमोरी नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी भाजपचे हैदरभाई पंजवानी यांची बहुमताने निवड             दुसऱ्या दिवशीही पेंढरी येथे तालुका निर्मितीसाठी हजारो नागरिकांचे आंदोलन सुरुच             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
95%
नाही :
5%

राईसमिलमध्ये अडकून महिलेचा मृत्यू

Friday, 16th February 2018 01:48:08 PM

सिरोंचा, ता.१६: धान भरडाई करीत असताना मशिनमध्ये अडकल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना काल(ता.१५)दुपारी अडीच वाजताच्या सुमारास असरअली पोलिस ठाण्यांतर्गत कोतापल्ली येथे घडली. गौरता दुर्गम(५०)असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

कोतापल्ली येथील गौरता दुर्गम ही महिला काल दुपारी गावातील राईस मिलमध्ये धान भरडाई करण्याकरिता गेली होती. मिल सुरु असताना अचानक तिचा पदर पंख्यात अडकला. यामुळे ती मशिनमध्ये येऊन पोट चिरल्या गेले. यामुळे तिचा मृत्यू झाला. राईसमिलला परवानगी नाही व पंख्यावर जाळी लावलेली नाही, त्यामुळे महिलेला जीव गमवावा लागल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान २४ तास उलटूनही पोलिसांनी राईस मिल मालकावर कारवाई न केल्याने संतापलेल्या गावकऱ्यांनी महिलेचा मृतदेह घेऊन सिरोंचा तहसील कार्यालय गाठले. त्यानंतर त्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले. यापूर्वी यात राईसमिलमध्ये एक पुरुष व एक महिला जखमी झाले होते.

दरम्यान, याप्रकरणी राईसमिलमालक सम्मी रेड्डी याच्यावर असरअली पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आज संध्याकाळी गडचिरोली पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
9LSK4
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना