मंगळवार, 18 सप्टेंबर 2018
लक्षवेधी :
  कुरखेड्यात शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपात, तर गडचिरोलीत बजरंग दलाच्या प्रखंड संयोजकासह चौघांचा काँग्रेसमध्ये प्रवेश             ओबीसीच्या मुद्द्यावर भाजप लोकप्रतिनिधींचे पितळ उघडे पडले-आ.विजय वडेट्टीवार यांचे टीकास्त्र             भाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा सिरोंचा तहसील कार्यालयावर मोर्चा             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
96%
नाही :
4%

पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास ५ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा

Thursday, 15th February 2018 03:06:31 PM

गडचिरोली, ता.१५: नाकाबंदीदरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन चालवून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या अवैध दारु वाहतूकदारास येथील सत्र न्यायालयाने ५ वर्षांचा सश्रम कारावास व २ हजार ६०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. प्रणव प्रेमांनद बाला, रा.विवेकानंदपूर, ता.मुलचेरा असे दोषी इसमाचे नाव आहे.

१८ नोव्हेंबर २०१० ची ही गोष्ट आहे. अहेरी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक श्री. पाटील हे आपल्या सहकारी पोलिसांसह व्यंकटरावपेठा ते देवलमरी रस्त्यावर नाकाबंदी करीत असताना त्यांना महिंद्रा पिकअप वाहन येताना दिसले. वाहन अडविण्याचा प्रयत्न करताच वाहनचालक प्रणव प्रेमानंद बाला याने वाहन न थांबविता ते पोलिसांच्या अंगावर नेले. यावेळी पोलिसांनी प्रसंगावधान राखून आरोपी प्रणव बाला यास घटनास्थळीच पकडले. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यात देशी व विदेशी दारु आढळून आली व ती दारु व्यंकटरावपेठा येथील रेणुका तोर्रेम हिला पोहचवून देण्यात येत होती, असे पोलिसांना चौकशीदरम्यान आढळून आले. पोलिसांनी आरोपी प्रणव बाला यास पकडले. मात्र, किशोर चंदू कुंडू, रा.नरेंद्रपूर, किरण सल्लम रा.आलापल्ली, तुषार कुंडू व किशोर शेडमाके हे फरार होण्यात यशस्वी झाले. हवालदार बाळा देवाजी ताकसांडे यांच्या तक्रारीवरुन अहेरी पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३०७, ३५३, १४३, १४७, १४८ व १४९, सहकलम ६५(ई) मुंबई दारुबंदी कायदा सहकलम १८४ व ११९ मोक्का अन्वये गुन्हा दाखल केला. अहेरीचे तत्कालिन पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी आरोपींना अटक करुन साक्षदारांचे जवाब नोंदविल्यानंतर गुन्ह्याचा तपास पूर्ण करुन प्रकरण न्यायालयात वर्ग केले.

आज या प्रकरणाचा निकाल लागला. सत्र न्यायालयाने साक्ष पुरावा तपासून व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपी प्रणव बाला यास ५ वर्षांचा सश्रम कारावास व २६०० रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. उर्वरित आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.

सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अनिल प्रधान यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलिस निरीक्षक प्रफुल्ल कदम यांनी जबाबदारी सांभाळली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
4A96N
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना