रविवार, 23 सप्टेंबर 2018
लक्षवेधी :
  शिक्षक बदली घोटाळ्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी सभापती विश्वास भोवते यास अटक, न्यायालयीन कोठडीत रवानगी             कोंबडी चोरुन खाल्ली म्हणून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास ५ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा-जिल्हा व सत्र न्यायालयाचा निवाडा             नक्षल्यांनी कमलापूरच्या मुख्य चौकात बांधले बॅनर, परिसरात दहशत             राष्ट्रीय ओबीसी महासंघाने जाळला ११ सप्टेंबरचा ओबीसींवर अन्याय करणारा जीआर             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
96%
नाही :
4%

चांगल्या गुणांनी समाजाचे हित साधणे हेच खरे सौंदर्य:विद्या बाळ

Friday, 2nd February 2018 02:13:11 PM

कुरखेडा, ता.२: सौंदर्य हे मुलीचे सामर्थ्य आहे, तर सामर्थ्य हे मुलाचे सौंदर्य असते, अशी जुनी म्हण आहे. मात्र, हे वास्तव नाही. सौंदर्य हे नाशवंत असून, त्याचा अभिमान बाळगू नये. खरे तर सौंदर्य विचारांत असते. आपल्यातील चांगल्या गुणांनी समाजाचे हित साधता आले तर तेच खरे सौंदर्य असते, असे प्रतिपादन पुणे येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, सुप्रसिद्ध लेखिका व स्त्री चळवळीच्या नेत्या विद्या बाळ यांनी आज येथे केले. .

श्री.गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयाच्या वार्षिक सांस्कृतिक कला महोत्सवाचे उद्घाटन विद्या बाळ यांच्या हस्ते झाले, त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्या बोलत होत्या. दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्थेचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून 'आम्ही आमच्या आरोग्यासाठी' संस्थेचे संचालक डॉ.सतीश गोगुलवार, सामाजिक कार्यकर्त्या शुभदा देशमुख उपस्थित होते. 

विद्या बाळ पुढे म्हणाल्या, आपल्या ताकदीने कुणावर वर्चस्व गाजविणे म्हणजे पुरुषाचे सौंदर्य नव्हे. आपल्या सामर्थ्याचा उपयोग समाजाकरिता करीत असेल तर ते खरे सौंदर्य आहे. 

विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षण मिळणे गरजेचे आहे. मुलीची मासिक पाळी व मुलाचे स्वप्नदोष ही जीवशास्त्रीय प्रक्रिया आहे. त्यात काहीही वाईट नाही. मात्र, याबाबत समाजाची मानसिकता बदलून मुला-मुलींना शास्त्रीय माहिती मिळणे गरजेचे आहे. मुला-मुलींमध्ये निर्माण होणारे शारीरिक आकर्षण, प्रेम व त्याची परिणती याबाबत बाळगावयाची दक्षता याचे सविस्तर विवेचन करुन श्रीमती बाळ यांनी विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली..

याप्रसंगी विद्या बाळ यांनी महाविद्यालयातर्फे विद्यार्थिनींकरिता सॅनेटरी नॅपकिन पुरविण्याच्या उपक्रमाची प्रशंसा केली. त्यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या 'मृदगंध' या वार्षिकांकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मंचावर उपप्राचार्य डॉ.किशोर खोपे, डॉ. अभय साळुंखे, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.डॉ.गुणवंत वडपल्लीवार, विद्यार्थी प्रतिनिधी अभिजित बोरकुटे, मनिष येवले, मयुरी बन्सोड, पल्लवी धुर्वे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे, संचालन मयुरी मेश्राम, तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ.गुणवंत वडपल्लीवार यांनी केले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
W3S44
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना