रविवार, 23 सप्टेंबर 2018
लक्षवेधी :
  शिक्षक बदली घोटाळ्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी सभापती विश्वास भोवते यास अटक, न्यायालयीन कोठडीत रवानगी             कोंबडी चोरुन खाल्ली म्हणून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास ५ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा-जिल्हा व सत्र न्यायालयाचा निवाडा             नक्षल्यांनी कमलापूरच्या मुख्य चौकात बांधले बॅनर, परिसरात दहशत             राष्ट्रीय ओबीसी महासंघाने जाळला ११ सप्टेंबरचा ओबीसींवर अन्याय करणारा जीआर             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
96%
नाही :
4%

गळा चिरुन युवतीची हत्या

Friday, 2nd February 2018 02:14:53 PM

बंडूभाऊ लांजेवार/कुरखेडा, ता.२: एका युवतीची गळा चिरुन हत्या करण्यात आल्याची घटना आज सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास कुरखेड्यापासून १ किलोमीटर अंतरावरील गांधीनगर(डिप्राटोला)-तळेगाव रस्त्यावरील जंगलात उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

डिप्राटोला-तळेगाव हा मार्ग साधारणत: ३ किलोमीटर लांबीचा असून, तो फार वर्दळीचा नसतो. या मार्गावर डिप्राटोला गावापासून एक किलोमीटर अंतरावरील जंगलात एक युवती मृतावस्थेत असल्याचे गुराख्यांना आढळून आली. जवळ जाऊन पाहिले असता तिचा गळा चिरल्याचे दिसून आले. ही वार्ता पसरताच परिसरात खळबळ माजली. उपविभागीय पोलिस अधिकारी शैलेश काळे, सहायक पोलिस निरीक्षक गजानन पडळकर हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. मृत युवतीचा वर्ण गोरा असून, ती ५ फूट उंचीची आहे. तिचे वय अंदाजे १७ ते १८ वर्षे असावे. तिने काळा जीन्स पँट, टॉप व त्यावर काळ्या रंगाचा जर्किन परिधान केला होता. तिच्या चेहऱ्याला उधळी लागली होती. मृतदेहाशेजारी ब्लेडचे आतील कव्हर होते. यावरुन ब्लेडने गळा चिरुन तिची हत्या केल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तिच्या खिशाचा आतील भाग बाहेर आल्याचे दिसत होते. त्यामुळे मारेकऱ्याने तिच्या खिशातून मोबाईल काढला असावा, अशी शक्यता आहे. या घटनेचा उलगडा पोलिस तपासानंतरच होणार आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
4E4US
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना