रविवार, 23 सप्टेंबर 2018
लक्षवेधी :
  शिक्षक बदली घोटाळ्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी सभापती विश्वास भोवते यास अटक, न्यायालयीन कोठडीत रवानगी             कोंबडी चोरुन खाल्ली म्हणून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास ५ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा-जिल्हा व सत्र न्यायालयाचा निवाडा             नक्षल्यांनी कमलापूरच्या मुख्य चौकात बांधले बॅनर, परिसरात दहशत             राष्ट्रीय ओबीसी महासंघाने जाळला ११ सप्टेंबरचा ओबीसींवर अन्याय करणारा जीआर             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
96%
नाही :
4%

रेगडीत विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून केले हुंडाप्रथेबाबत प्रबोधन

Thursday, 1st February 2018 11:40:52 AM

गडचिरोली, ता.१: समाज कितीही सुशिक्षित झाला असला, तरी आजही हुंड्यासारखी कुप्रथा समाजात आहे. या प्रथेवर आसूड ओढण्यासाठी रेगडी येथील राजे धर्मराव हायस्कूलचे विद्यार्थी पुढे सरसावले आणि हजारो लोकांपुढे त्यांनी अप्रतिम पथनाट्य सादर करुन समाजप्रबोधन केले.

निमित्त होते प्रजासत्ताक दिनाचे. या दिवशी रेगडी येथील पोलिस मदत केंद्राच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राजे धर्मराव हायस्कूलचे कला शिक्षक पिनाग झोडे यांनी आपल्या कल्पकतेतून हुंडा प्रथेवर पथनाट्याची निर्मिती केली. एका गरीब कुटुंबातील सुशिक्षित मुलीची लग्नानंतर हुंड्यासाठी कशी अवहेलना होते, याचे जीवंत चित्रण कलावंत विद्यार्थ्यांनी आपल्या कसदार अभिनयाद्वारे सादर केले. आजच्या विज्ञान युगातही काही रुढी व परंपरा समाजाला पोखरत आहेत. हुंडा प्रथा ही त्यातीलच एक आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान देणाऱ्या महात्मा गांधींनी पुन्हा स्वतंत्र भारतात येऊन या कुप्रथा बंद कराव्यात, अशी आर्त हाक या पथनाट्यातून देण्यात आली.

या पथनाट्यात राहुल चन्नावार, प्रिया बाच्छाड, चंदना मंडल, सृष्टी आकेवार, रुपाली नेवारे, वैष्णवी जयस्वाल, प्रीती बिस्वास, सम्राट मंडल, सरस्वती कितृनिया, प्रिया कुसराम, वर्षा दुतखोरे, लक्ष्मी मंडल, आचल मेश्राम, सोनाली नेवारे, ज्योती दास, प्रणिता रॉय, प्रीती सरोवर, सरिता समद्दार, प्रणोती बिस्वास, विशाल रॉय, सुरंजन बराल, महेश सरकार, राकेश हलदर, अनिकेत लेखामी, साजन हलदर, राकेश हलदर, मोहन बिस्वास, नंदकिशोर मंडल, आर्यन पेद्दीवार आदींनी या पथनाट्यात भाग घेऊन प्रबोधन केले.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मुख्याध्यापक श्री.मंडल, कोठारे, गाडगे, रणदिवे, हलदर, खुटाळे, शांतलवार, सुखदेवे, झोडे, मितलामी, फलके, दुर्गे आदींनी सहकार्य केले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
1547E
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना