रविवार, 23 सप्टेंबर 2018
लक्षवेधी :
  शिक्षक बदली घोटाळ्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी सभापती विश्वास भोवते यास अटक, न्यायालयीन कोठडीत रवानगी             कोंबडी चोरुन खाल्ली म्हणून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास ५ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा-जिल्हा व सत्र न्यायालयाचा निवाडा             नक्षल्यांनी कमलापूरच्या मुख्य चौकात बांधले बॅनर, परिसरात दहशत             राष्ट्रीय ओबीसी महासंघाने जाळला ११ सप्टेंबरचा ओबीसींवर अन्याय करणारा जीआर             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
96%
नाही :
4%

काँग्रेसने गडचिरोलीत काढली संविधान व लोकशाही बचाव रॅली

Friday, 26th January 2018 09:47:41 AM

गडचिरोली, ता.२६: केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या काही निर्णयांमुळे भारतीय राज्यघटनेला धक्का बसेल, अशी शंका सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे. देशाची धर्मनिरपेक्षताही धोक्यात आली आहे. आजची ही परिस्थिती लक्षात घेता जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज प्रजासत्ताक दिनी गडचिरोलीत संविधान व लोकशाही बचाव रॅली काढण्यात आली.

यावेळी माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.नामदेव उसेंडी, माजी जिल्हाध्यक्ष हसनअली गिलानी, जिल्हा परिषद सदस्य अॅड.राम मेश्राम, जिल्हा महासचिव प्रभाकर वासेकर, तालुकाध्यक्ष शंकरराव सालोटकर, समशेरखान पठाण, शहराध्यक्ष सतीश विधाते, पंकज गुड्डेवार, ओबीसी सेलचे अध्यक्ष पांडुरंग घोटेकर, पुरुषोत्तम मसराम, नंदू वाईलकर, रामदास टिपले, लहुकुमार रामटेके, बाबूराव बावणे, महादेव भोयर, तुळशीदास भोयर, रजनिकांत मोटघरे, तौफिक शेख, नीतेश राठोड, प्रतीक बारसिंगे, राकेश रत्नावार, जितेंद्र मुनघाटे, सुभाष धाईत, भास्कर नरुले, राजू आखाडे, निलीमा राऊत, अपर्णा खेवले, रोहिणी मसराम, बबिता उसेंडी, दर्शना लोणारे, कल्पना नंदेश्वर, दर्शना मेश्राम, सत्यविजय देवतळे, पुष्पराज लाडे यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
JCB51
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना