गुरुवार, 28 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

धानोऱ्यात एकाच रात्री सहा ठिकाणी घरफोड्या, नागरिक भयभीत

Tuesday, 16th January 2018 05:26:28 AM

धानोरा, ता.१६: चोरट्यांनी आज मध्यरात्री शहरातील सहा ठिकाणी घरफोडी करुन एक मोटारसायकल पळवून नेल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.

चोरट्यांनी आज मध्यरात्री शहरातील मुख्य चौकातील पप्पू ज्वेलर्स हे सोनाचांदीचे दुकान फोडले. त्यानंतर प्राचार्य जयश्री लोखंडे व त्यांच्या भाडेकरु तोंडरे यांचे घर फोडून सामानाची नासधूस केली. तसेच टी.जी.कोरेटी व मेंढे यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. परंतु तेथे काहीच आढळून न आल्याने चोरट्यांची निराशा झाली. त्यानंतर चोरट्यांनी मुलींच्या वसतिगृहाजवळील भरडकर यांच्या घरात प्रवेश केला. त्यांचे भाडेकरु राहुल माहुरकर यांची एमएच ३३-एन २१७२ होंडा कंपनीची मोटारसायकल चोरुन नेली. हे सर्वजण मकर संक्रांतीनिमित्त बाहेरगावी गेले होते. आज सकाळी घरी परतताच त्यांनी चोरी झाल्याचे दिसून आले. मागील महिन्यात चोरट्यांनी बोडगेवार यांचे किराण दुकान तसेच मेडीकल स्टोअर्स फोडले होते. आज एकाच रात्री सहा घरफोड्या झाल्याने चोरट्यांची टोळी सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. या घटनांमुळे नागरिक भयभीत झाले असून, पोलिसांनी रात्री गस्त वाढवावी, अशी मागणी केली आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
6K7HI
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना