रविवार, 18 फेब्रुवारी 2018
लक्षवेधी :
  मोटारसायकल अपघातात तीन जण जागीच ठार, गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील देवडी फाट्यावरील घटना             पोलिस भरतीच्या जागा वाढवा, जीडीसीसी बँकेतील गुणांची अट रद्द करुन आरक्षण द्या, अन्यथा आंदोलन-सुशिक्षित बेरोजगारांचा इशारा             राईसमिलमध्ये अडकून महिलेचा मृत्यू-सिरोंचा तालुक्यातील कोतापल्ली येथील घटना, मिलमालकावर गुन्हा दाखल             ऐकावे ते नवलच!-देसाईगंज नगर पालिकेत तब्बल १९ शासकीय कर्मचाऱ्यांना देण्यात आला घरकुल योजनेचा लाभ             पोलिसांच्या अंगावर वाहन चालवून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस ५ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा- गडचिरोलीच्या सत्र न्यायालयाचा निवाडा             शिक्षिकेच्या समयसूचकतेमुळे बालिकेच्या अपहरणाचा प्रयत्न फसला-देसाईगंज येथील घटना             दोन वर्षांत एक टक्क्याने वाढले देशातील वनक्षेत्र-केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाच्या अहवालातील माहिती             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात जमिनी व प्लॉटस् विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ७९७२८८०५१३           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : गडचिरोली जिल्हयातील गैरआदिवासींच्या प्रश्नांकडे राज्य सरकार डोळेझाक करीत आहे, असे वाटते काय?
होय :
77%
नाही :
23%

गट्टा-हेडरी मार्गावर आढळली १५ किलो स्फोटके

Saturday, 6th January 2018 01:16:33 AM

गडचिरोली, ता.६: एटापल्ली तालुक्यातील गट्टा-हेडरी मार्गावर गट्टा पोलिस मदत केंद्रापासून अवघ्या २ किलोमीटर अंतरावर १५ किलो स्फोटके आढळून आली. ही स्फोटके हुडकून काढण्यात पोलिसांना यश आल्याने मोठा अनर्थ टळला.

काल सीआरपीएफ व जिल्हा पोलिस नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना गट्टा पोलिस मदत केंद्राच्या पश्चिमेस २ किलोमीटर अंतरावर जांभिया पुलाजवळ एक वायर दिसला. पोलिसांनी बॉम्बशोधक व नाशक पथकाला माहिती दिली. त्याठिकाणी स्फोटके असल्याचे बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या लक्षात आले. त्यांनी बराच वेळपर्यंत स्फोटके काढण्याचा प्रयत्न केला. स्फोटके उशिरा नष्ट करण्यात त्यांना यश आले. ही स्फोटके १५ किलो वजनाची होती.

गट्टा-हेडरी मार्गावरुनच सुरजागड लोहखनिज आणणारे ट्रक ये-जा करीत असतात. या परिसरात पोलिस तैनात असल्याने तेही ये-जा करीत असतात. त्यामुळे पोलिस व खनिज आणणाऱ्या मंडळींचा घातपात करण्याचा नक्षल्यांचा हेतू होता. परंतु जवानांनी नक्षल्यांचा प्रयत्न उधळून लावला.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
48OVY
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना