बुधवार, 24 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

कमल-गोविंद प्रतिष्ठानतर्फे १२ जानेवारीला गडचिरोलीत सुमधूर गीतांचा कार्यक्रम

Friday, 5th January 2018 01:58:58 AM

गडचिरोली, ता.५: येथील कमल-गोविंद स्मृती प्रतिष्ठानतर्फे प्रसिद्ध साहित्यिक दिवंगत गो.ना.मुनघाटे यांच्या जयंतीनिमित्त १२ जानेवारीला राजेश दुरुगकर यांचा 'राग-अनुराग' हा शास्त्रीय संगीतावर आधारित हिंदी-मराठी सुमधूर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

१२ जानेवारीला संध्याकाळी साडेसहा वाजता विद्याभारती कन्या हायस्कूलच्या प्रांगणात हा कार्यक्रम होणार आहे. दिवंगत गो.ना.मुनघाटे यांनी दंडकारण्य शैक्षणिक, सांस्कृतिक विकास व संशोधन संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यात शाळा, महाविद्यालयांचे जाळे निर्माण करुन गोरगरिबांना शिक्षणाची संधी उपलब्ध करुन दिली. त्यांनी लिहिलेली 'माझी काटेमुंढरीची शाळा' ही कादंबरीही बरीच गाजली. त्यांच्या कार्याचे स्मरण म्हणून दरवर्षी कमल-गोविंद प्रतिष्ठानतर्फे १२ जानेवारीला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यापूर्वी प्रख्यात पत्रकार व साप्ताहिक 'चित्रलेखा'चे संपादक ज्ञानेश महाराव, तसेच ज्येष्ठ साहित्यिक डॉ.अक्षयकुमार काळे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यंदा राजेश दुरुगकर आणि संच यांच्या सुमधूर गीतांची मेजवानी रसिकांना मिळणार आहे.

नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन दंडकारण्य शैक्षणिक, सांस्कृतिक विकास व संशोधन संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे व कमल-गोविंद प्रतिष्ठानचे आमंत्रक प्राचार्य भैयासाहेब ठाकरे यांनी केले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
CA94L
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना