सोमवार, 23 जुलै 2018
लक्षवेधी :
  माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या दुधबळे यांचे दीर्घ आजाराने निधन             रोहयोचे १८ कोटी रुपये तत्काळ द्या:आ.डॉ.देवराव होळी यांची विधानसभेत मागणी             अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा-गडचिरोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचा निवाडा             पहिल्‍याच पावसात वाहून गेला चिरचाडी येथील कोल्हापुरी बंधारा, निकृष्ट बांधकामाचा परिणाम             नागपूर व गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात फ्लॅटस्, प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ७९७२८८०५१३           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
96%
नाही :
4%

भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ आज गडचिरोली जिल्हा बंदची हाक

Wednesday, 3rd January 2018 03:17:48 AM

गडचिरोली, ता.३: भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या आंबेडकरी अनुयायांवर हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी आंबेडकरी संघटना व विविध राजकीय पक्षांच्या वतीने आज गडचिरोली जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

बंदच्या अनुषंगाने काल(ता.२) विश्रामगृहात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.नामदेव उसेंडी, भारिप बहुजन महासंघाचे प्रदेश निरीक्षक रोहिदास राऊत, ओबीसी कर्मचारी संघटनेचे प्रा.शेषराव येलेकर, संभाजी ब्रिगेडचे दादाजी भर्रे, नगरसेवक प्रा.रमेश चौधरी, बीआरएसपीचे डॉ.कैलास नगराळे, भारिप बमसंचे जिल्हाध्यक्ष प्रा.प्रकाश दुधे, नगरसेवक सतीश विधाते, ओबीसी युवा संघटनेचे रुचित वांढरे उपस्थित होते. शाळा, महाविद्यालये व व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवून नागरिकांनी हल्ल्याचा निषेध करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

दरम्यान भीमा कोरेगावच्या घटनेनंतर नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन जिल्हा पोलिसांनी केले आहे. सोशल मीडियावर तणाव निर्माण करणाऱ्या पोस्ट टाकू नये, तसेच अशा पोस्ट टाकणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
0N4EP
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना