सोमवार, 23 जुलै 2018
लक्षवेधी :
  माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या दुधबळे यांचे दीर्घ आजाराने निधन             रोहयोचे १८ कोटी रुपये तत्काळ द्या:आ.डॉ.देवराव होळी यांची विधानसभेत मागणी             अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा-गडचिरोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचा निवाडा             पहिल्‍याच पावसात वाहून गेला चिरचाडी येथील कोल्हापुरी बंधारा, निकृष्ट बांधकामाचा परिणाम             नागपूर व गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात फ्लॅटस्, प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ७९७२८८०५१३           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
96%
नाही :
4%

विहिरीत बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू, शंकाकुशंकांना उधाण

Saturday, 23rd December 2017 02:26:40 PM

गडचिरोली, ता.२३: दोन चिमुकल्या मुलांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज दुपारी १ वाजताच्या सुमारास पोर्ला येथे घडली. दरम्यान, मातेने पोटच्या दोन चिमुकल्यांना विहिरीत ढकलून त्यांची हत्या केल्याची चर्चा गावात असल्याने शंकाकुशंकांना पेव फुटले आहे. अनुप किशोर राऊत(६) व अनुष किशोर राऊत(४) अशी मृत बालकांची नावे आहेत.

पोर्ला येथील किशोर राऊत हे प्राथमिक आरोग्य केंद्राजवळच्या परिसरात आई, वडील, पत्नी व दोन मुलांसह वास्तव्य करतात. ते शेतकरी आहेत. आज दुपारी किशोर राऊत यांची पत्नी गीता राऊत ही आपल्या दोन मुलांना घेऊन श्री.उपासे यांच्या शेतातील विहिरीकडे गेली. त्यानंतर काही वेळानेच दोन्ही मुलांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची बातमी गावात पसरली. दरम्यान, गीता राऊत हिनेच घरगुती वादातून मुलांना विहिरीत ढकलल्याची चर्चा गावात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संजय सांगळे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याप्रकरणी पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. घरगुती वादातून ही घटना झाल्याची प्राथमिक माहिती असून, तपासाअंती सत्यता कळेल, असे श्री.सांगळे यांनी सांगितले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
AKHBX
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना