गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

सिनेट निवडणूक-महाआघाडीचा दणदणीत विजय, भाजपप्रणित शिक्षण मंचचा दारुण पराभव

Thursday, 14th December 2017 08:03:02 AM

गडचिरोली, ता.१४:येथील गोंडवाना विद्यापीठाच्या पदवीधर, विद्या परिषद व अभ्यास मंडळांच्या सिनेट निवडणुकीत यंग टीचर्स असोसिएशन व महाआघाडीच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवून भाजपप्रणित अभाविप व शिक्षण मंचचा दारुण पराभव केला.

गोंडवाना विद्यापीठाची पदवीधर अधिसभा, विद्या परिषद व अभ्यास मंडळांची निवडणूक १० डिसेंबरला पार पडली. यात भाजप व रा.स्व.संघप्रणीत शिक्षण मंच, सेक्युलर महाआघाडी व यंग टिचर्स असोसिएशन पूर्ण तयारीने कामाला लागले होते. काल(ता.१३) सकाळी मतमोजणीस सुरुवात झाली. आज(ता.१४)सकाळी १० वाजता मतमोजणी संपली. त्यात सेक्युलर महाआघाडी व यंग टिचर्स असोसिएशनने विद्यापीठाच्या सर्व अधिसभांवर ताबा मिळविला.

सर्वांचे लक्ष लागलेल्या विद्यापीठ अधिसभा गटात शिक्षक महाआघाडीचे १० पैकी ७ उमेदवार निवडून आले. खुल्या प्रवर्गातून शिक्षक महाआघाडीचे अॅड.गोविंद भेंडारकर, अजय लोंढे व प्रशांत ठाकरे विजयी झाले. याच आघाडीचे अनुसूचित जाती गटातून दीपक धोपटे, एनटी गटातून अजय बतकमवार, ओबीसी गटातून सुनील शेरकी व महिला गटातून संध्या शेषराव येलेकर निवडून आल्या. मात्र, विजय कुत्तरमारे, ऋषिकांत पापडकर व अनुसूचित जमाती गटातून रवींद्र नैताम यांना पराभव पत्करावा लागला. अनुसूचित जमाती गटातून अभाविप आणि शिक्षणमंचच्या तनुश्री धर्मरावबाबा आत्राम, खुल्या प्रवर्गातील प्रशांत दोंतुलवार व प्राचार्य देविदास चिलबुले विजयी झाले. मात्र, गोविंद सारडा, अॅड.आशिष धर्मपुरीवार, धनंजय पोरके, शंकर मगडीवार व नीलेश जाधव पराभूत झाले. अभाविप व शिक्षण मंचचे दिग्गज उमेदवार संदीप लांजेवार व गीता सुशील हिंगे यांना पराभव पत्करावा लागला.

प्राचार्य गटात खुल्या प्रवर्गातून डॉ.पी.अरुणप्रकाश, डॉ.अजिजुल हक, डॉ.राजाभाऊ मुनघाटे, डॉ.संजय सिंग, डॉ.लालसिंग खालसा, तर अनुसूचित जाती गटातून डॉ.प्रमोद काटकर, विमुक्त जाती प्रवर्गातून डॉ.अनिल कोरपेनवार, ओबीसी प्रवर्गातून डॉ.लेमराज लडके व महिला प्रवर्गातून डॉ.हंसा तोमर हे आधीच बिनविरोध निवडून आले आहेत. अनुसूचित जमाती प्रवर्गातील पद रिक्त राहिले आहे.

व्यवस्थापन प्रतिनिधी गटात खुल्या प्रवर्गातून सेक्युलर महाआघाडीचे डॉ.विवेक निळकंठराव शिंदे, डॉ.दिलीप जयस्वाल, डॉ.कीर्तीवर्धन दीक्षित व शिक्षण मंचचे संदीप वसंतराव पोशट्टीवार हे विजयी झाले. अनुसूचित जाती प्रवर्गातून सेक्युलर महाआघाडीचे प्रा.देवेश मारोतराव कांबळे यांनी विजयश्री मिळविली. महिला प्रवर्गातील पद रिक्त आहे. 

महाविद्यालयीन अध्यापक गटात खुल्या प्रवर्गातून प्रा.प्रदीप घोरपडे, प्रा.परमानंद बावनकुळे, प्रा.रमेश ठोंबरे, प्रा.पराग धनकर, प्रा.प्रकाश रघुनाथ शेंडे निवडून आले. अनुसूचित जाती प्रवर्गातून प्रा.प्रमोद शंभरकर, अनुसूचित जमाती प्रवर्गातून प्रा.रमेश हलामी, विमुक्त जमाती प्रवर्गातून प्रा.योगेश दुधपचारे, ओबीसी प्रवर्गातून प्रा.नामदेव वरभे व महिला प्रवर्गातून प्रा.डॉ.प्रगती नरखेडकर विजयी झाले. 

विद्यापरिषदेच्या महाविद्यालय अध्यापक गटात ८ जागांसाठी निवडणूक झाली. त्यात विज्ञान व तंत्रज्ञान गटात खुल्या प्रवर्गातून सुधीर आक्कोजवार, वाणिज्य व व्यवस्थापन गटात खुल्या प्रवर्गातून जयदेव देशमुख, मानवविज्ञान गटात खुल्या प्रवर्गातून डॉ.संजय गोरे, आंतरविज्ञान शाखीय अभ्यास गटात खुल्या प्रवर्गातून डॉ.संजीव निंबाळकर, विज्ञान व तंत्रज्ञान गटात ओबीसी प्रवर्गातून डॉ.प्रवीण तेलखेडे विजयी झाले. वाणिज्य व व्यवस्थापन गटात अनुसूचित जमातीचा महिला प्रवर्ग, मानवविज्ञान गटातील अनुसूचित जाती प्रवर्ग व आंतरविज्ञानशाखीय अभ्यास गटात विमुक्त जाती प्रवर्गाचे पद रिक्त राहिले आहे.

अभ्यास मंडळात संलग्न महाविद्यालये व मान्यताप्राप्त परिसंस्थांमधील विभागप्रमुखांच्या प्रत्येक अभ्यासमंडळाच्या ३ याप्रमाणे २५८ जागा भरावयाच्या होत्या. परंतु केवळ ८६ पैकी केवळ ३६ अभ्यास मंडळांकरिता नामनिर्देशनपत्रे प्राप्त झाली. त्यापैकी २९ अभ्यास मंडळांकरिता ३ व त्यापेक्षा कमी नामनिर्देशनपत्र होते. त्यामुळे केवळ ७ अभ्यासमंडळांकरिता निवडणूक झाली. यात विज्ञान व तंत्रज्ञान गटात भौतिकशास्त्र विषयात डॉ.पांडुरंग मोहरकर, प्रा.रमेश ठोंबरे, प्रा.रंजित मंडल, रसायनशास्त्र विषयात प्रा.अपर्णा धोटे, प्रा.प्रवीण जोगी व डॉ.व्ही.के.बत्रा निवडून आले. गणित विषयात डॉ.सौ.चेतना भोंगळे, डॉ.लालसिंग खालसा व डॉ.ज्ञानदेव वराडे विजयी झाले. विज्ञान व तंत्रज्ञान गटात जनरल इंजिनिअरिंग, अप्लाईड सायंस अँड ह्युमॅनिटीज या गटात व्ही.एस.गोगुलवार, एस.ए.पावडे व एस.एन.बिसेन अविरोध निवडून आले. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मंडळात जाफर जावेद खान, राजेंद्र धात्रक, कम्प्युटर टेक्नॉलॉजी मंडळात रहिला शेख, जीवरसायनशास्त्र अभ्यासमंडळात डॉ.गोपाळ गोंड, जीऑलॉजीमध्ये डॉ.चंद्रकांत डोर्लीकर, डॉ.किशोर कोरडे, इलेक्ट्रॉनिक्स(इन्स्ट्रुमेंटेशन) मंडळात डॉ.अमृत लंजे, डॉ.धनंजय गहाणे, पर्यावरणशास्त्र मंडळात महेंद्र ठाकरे, संगणक शास्त्र विषयात डॉ.श्रीनिवास बालसुब्रमण्यम व डॉ.केशव कळसकर, सुक्ष्मजीवशास्त्र विषयात डॉ.विजय वाढई, डॉ.प्यारेलाल कुंभारे व अभय साळुंखे, भाषाशास्त्र विषयातून ज्योती पायघन, डॉ.मिनाक्षी जुमडे व संभाजी वरकड, प्राणीशास्त्र विषयात डॉ.लक्ष्मण रोहणकर, डॉ.अमीर धमानी व डॉ.गणपज देशमुख, वनस्पतीशास्त्र विषयात डॉ.सौ.वसंती रेवतकर, अनिल कोरपेनवार व संजय दुधे, सिव्हील इंजिनिअरिंगमध्ये डॉ.ए.झेड.चिताडे व डॉ.ए.पी.सिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विषयात डॉ.प्रवीण पोटदुखे, राजेश ठोंबरे व विनोद गोरंटीवार, मायनिंग इंजिनिअरिंगमध्ये मनिष उत्तरवार, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगमध्ये नवनाथ नेहे हे बिनविरोध निवडून आले.

वाणिज्य व व्यवस्थापन विषयात डॉ.रवींद्र मुरमाडे, डॉ.यशवंत घुमे व श्रीलता पिल्लई निवडून आले. याच अभ्यासमंडळातील बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन अँड मॅनेजमेंट या विषयात डॉ.रेखा मेश्राम, जयदेव देशमुख व उत्तम घोसरे बिनविरोध निवडून आले. बिझनेस इकॉनॉमिक्समध्ये तात्याजी गेडाम, हरिश्चंद्र कामडी व डॉ.बंडू जांभूळकर, अकाउंटस् अँड स्टॅटीस्टीक्समध्ये डॉ.उत्तमचंद कांबळे, सुखदेव उमरे व डॉ.विजय टोंगे बिनविरोध विजयी झाले. वाणिज्य विषयात डॉ.विश्वनाथ लाडे, डॉ.सुनील नरांजे व चंद्रभान जिवने, मानव विज्ञान अभ्यासमंडळात हिंदी विषयात डॉ.सुनीता बन्सोड, प्रा.डॉ.कल्पना कावळे व डॉ.सरिता तिवारी विजयी झाल्या. मराठी विषयासाठी प्रा.अनमोल शेंडे, डॉ.सुदर्शन हिवसे व डॉ.धनराज खानोरकर निवडून आले. इतिहास विषयात डॉ.भूपेश चिकटे, दिवाकर कामडी व डॉ.शरद बेलोरकर, भूगोल विषयात प्रा.योगेश दुधपचारे, डॉ.रवी रणदिवे बिनविरोध विजयी झाले. इंग्रजी विषयासाठी डॉ.अमुदला चंद्रमौली, बाळकृष्ण कोंगरे व सुनील बिडवाईक, अर्थशास्त्र विषयात डॉ.पी.बी.तितरे, जनार्दन काकडे व श्रीराम कावळे बिनविरोध विजयी झाले. समाजशास्त्र विषयात राजेंद्र बारसागडे, डॉ.दिवाकर उराडे व पंढरी वाघ, गृहअर्थशास्त्र विषयात सरोज झंझाळ, डॉ.वंदना वैद्य व अमिता बन्नोरे, संगीत विषयात प्रमोद रेवतकर, विधी विषयात डॉ.बेन्नी एम.जे., शेख इजाज व आय.जे.राव, राज्यशास्त्रात प्रा.अशोक बहादुरे, डॉ.दिनकर चौधरी व प्रा.अशोक खोब्रागडे, समाजकार्यमध्ये डॉ.सुनील साकुरे हे बिनविरोध निवडून आले आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
0S1P5
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना