सोमवार, 23 जुलै 2018
लक्षवेधी :
  माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या दुधबळे यांचे दीर्घ आजाराने निधन             रोहयोचे १८ कोटी रुपये तत्काळ द्या:आ.डॉ.देवराव होळी यांची विधानसभेत मागणी             अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा-गडचिरोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचा निवाडा             पहिल्‍याच पावसात वाहून गेला चिरचाडी येथील कोल्हापुरी बंधारा, निकृष्ट बांधकामाचा परिणाम             नागपूर व गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात फ्लॅटस्, प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ७९७२८८०५१३           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
96%
नाही :
4%

लैंगिक शोषणप्रकरणी वाळू कंत्राटदार अजय येनगंटी यास अटक

Monday, 11th December 2017 01:06:40 PM

गडचिरोली, ता.११:एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अजय व्यंकटेश येनगंटी(४०)रा.अंकिसा याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे की, पीडित मुलीचे वयाच्या १५ व्या वर्षी लग्न झाले. परंतु नवरदेव न आवडल्याने ती दुसऱ्याच दिवशी माहेरी परत आली. मात्र, आईने तिला घरी ठेवण्यास नकार दिला. त्यामुळे पीडित मुलीने पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी मुलीच्या आई-वडिलांना समजाविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी मुलीला ठेवण्यास नकार दिला. त्यानंतर तिला अंकिसा येथील अजय येनगंटी याच्या आई शकुंतला येनगंटी यांच्या नावाने असलेल्या वसतिगृहात ठेवण्यात आले. पुढे तिला गडचिरोली येथील बालसुधारगृहात ठेवण्यात आले. तेव्हा अजय येनगंटी तिला भेटण्यासाठी जात होता. त्‍याने पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या अत्याचाराला कंटाळून पीडित मुलीने गडचिरोली येथील बाल न्यायमंडळ गाठले व आपबिती सांगितली. त्यानुसार गडचिरोली पोलिसांनी कलम ३७६ भादंवि सहकलम ४,६ बालकाच्या लैंगिक अत्याचार कायदा २०१२ , कलम ९ व १० अन्वये गुन्हा दाखल केला. गडचिरोली पोलिसांनी हे प्रकरण असरअली पोलिसांकडे पाठविले आहे. अजय येनगंटी हा रेती कंत्राटदार असून, पालकमंत्र्यांचा निकटचा असल्याची चर्चा आहे. असरअली पोलिसांनी आज येनगंटीला अटक केली आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
5M2VD
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना