शनिवार, 23 फेब्रुवारी 2019
लक्षवेधी :
  आरमोरी नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी भाजपचे हैदरभाई पंजवानी यांची बहुमताने निवड             दुसऱ्या दिवशीही पेंढरी येथे तालुका निर्मितीसाठी हजारो नागरिकांचे आंदोलन सुरुच             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
95%
नाही :
5%

मोटारसायकल अपघातात एक ठार

Saturday, 2nd December 2017 01:43:20 PM

कुरखेडा, ता.२: मोटारसायकलला झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार, तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना आज संध्याकाळी ५.३० वाजताच्या सुमारास कुरखेडा-देसाईगंज मार्गावरील कसारी फाट्याजवळ घडली. विलास दादाजी दडमल(४५)रा.पान्होळी, ता.नागभिड असे मृत इसमाचे नाव असून, गुलाब श्रीराम तोडासे(३०)रा.पान्होळी, हा गंभीर जखमी झाला आहे.

कसारी फाट्याजवळ मोटारसायकलला अपघात होऊन दोघे जण गंभीर अवस्थेत एका झुडपात निपचित पडल्याची माहिती रस्त्याने येणाऱ्या एका इसमाने १०८ क्रमांकाला मोबाईलवरुन दिली. लगेच रुग्णवाहिकेसह डॉक्टर व आरोग्य कर्मचारी घटनास्थळी हजर झाले. त्यांनी जखमीला कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मृतकाच्या खिशात आढळलेल्या चिठ्ठीवरुन त्याचे नाव विलास दडमल असल्याचे सांगितले जात आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
TK04V
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना