रविवार, 23 सप्टेंबर 2018
लक्षवेधी :
  शिक्षक बदली घोटाळ्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी सभापती विश्वास भोवते यास अटक, न्यायालयीन कोठडीत रवानगी             कोंबडी चोरुन खाल्ली म्हणून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास ५ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा-जिल्हा व सत्र न्यायालयाचा निवाडा             नक्षल्यांनी कमलापूरच्या मुख्य चौकात बांधले बॅनर, परिसरात दहशत             राष्ट्रीय ओबीसी महासंघाने जाळला ११ सप्टेंबरचा ओबीसींवर अन्याय करणारा जीआर             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
96%
नाही :
4%

कुरखेडा नगर पंचायतीच्या सभापतिपदांवर सत्तारूढ शिवसेना-कांग्रेसचा कब्जा

Saturday, 2nd December 2017 11:49:00 AM

कुरखेडा, ता.२: स्थानिक नगर पंचायतीच्या विषय समितीच्या सभापतिपदाकरिता आज झालेल्या निवडणुकीत सत्तारूढ शिवसेना- कांग्रेस युतीने चारही समित्यांवर कब्जा केला. बांधकाम समितीच्या सभापतिपदी शिवसेनेचे संतोष भट्टड यांची, तर पुंडलिक देशमुख यांची पाणीपुरवठा समितीच्या सभापतिपदावर वर्णी लागली. महिला व बालकल्याण समितीवर विद्यमान उपाध्यक्ष कांग्रेसच्या जयश्री धाबेकर यांची, तर मनोज सिडाम यांची आरोग्य व स्वछता समितीच्या सभापतिपदावर वर्णी लागली.

पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम यांनी काम पाहिले

याप्रसंगी शिवसेना व कांग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके फोडून विजयोत्सव साजरा केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जीवन नाट, जि.प. सदस्य प्रभाकर तुलावी, प्रल्हाद कराडे, शिवसेना तालुकाप्रमुख आशिष काळे, नगराध्यक्ष महेंद्रकुमार मोहबंसी, कांग्रेसचे तालुका अध्यक्ष जयंत हरडे, पंचायत समिती सभापती गिरिधारी तितराम, नवनाथ धाबेकर, अशोक इंदूरकर, नगरसेवक चित्रा गजभिये, आशा तुलावी, अनिता बोरकर, उस्मान पठाण, विजय पुस्‍तोडे, खुशाल बनसोड व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

१७ सदस्यीय कुरखेडा नगरपंचायतीत भाजपचे ७, शिवसेनेचे ५, काँग्रेसचे ३, राष्ट्रवादी काँग्रेसचा १ व अपक्ष १ असे बलाबल आहे. कुरखेड्यात शिवसेनेचे भाजपशी पटत नसल्याने दोन वर्षांपूर्वी शिवसेनेने काँग्रेसशी युती करुन सत्ता मिळविली. शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर काँग्रेसचा उपाध्यक्ष आहे. सत्ता मिळविताना शिवसेना-काँग्रेस युतीने ८ सदस्यांच्या गटाचे पत्र निवडणूक विभागाला दिले होते, तर भाजपकडे ७ सदस्यांचाच गट होता. त्यामुळे पीठासीन अधिकाऱ्यांनी सुरुवातीला स्थापन झालेला गट अधिकृत असल्याचे सांगितले. त्यामुळे अपक्ष सदस्याने शिवसेना-काँग्रेस युतीकडे उडी घेतली आणि या युतीच्या सदस्यांची संख्या ९ वर पोहचली. दुसरीकडे, भाजपकडे आता केवळ भाजपचे ७ व राष्ट्रवादीचा १ असे ८ सदस्य उरले आहेत. बहुमत असूनही भाजपला तांत्रिक चुकांमुळे नगर पंचायतीवरील सत्ता गमवावी लागली. यापूर्वी पाणीपुरवठा सभापतिपद भाजपकडे होते, त्यालाही मुकण्याची पाळी भाजपवर आली.

येत्या ६ महिन्यांनी नगराध्यक्षपदाची निवडणूक असून, नगराध्यक्षपद अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव आहे. ही एकमेव महिला सदस्य शिवसेना-काँग्रेस युतीकडे गेल्याने नगराध्यक्षदेखील या युतीचाच राहू शकतो.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
074E0
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना