रविवार, 23 सप्टेंबर 2018
लक्षवेधी :
  शिक्षक बदली घोटाळ्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी सभापती विश्वास भोवते यास अटक, न्यायालयीन कोठडीत रवानगी             कोंबडी चोरुन खाल्ली म्हणून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास ५ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा-जिल्हा व सत्र न्यायालयाचा निवाडा             नक्षल्यांनी कमलापूरच्या मुख्य चौकात बांधले बॅनर, परिसरात दहशत             राष्ट्रीय ओबीसी महासंघाने जाळला ११ सप्टेंबरचा ओबीसींवर अन्याय करणारा जीआर             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
96%
नाही :
4%

नक्षल्यांनी केली कोतवालाची हत्या

Thursday, 30th November 2017 04:10:57 AM

गडचिरोली, ता.३०: पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी काल(ता.२९)रात्री अहेरी तालुक्यातील दामरंचा उपपोलिस ठाण्यांतर्गत येरमनार येथील एका कोतवालाची गोळी घालून हत्या केली. रमेश पोचा रामटेके(४०) असे मृत इसमाचे नाव आहे. रमेश रामटेके हा शासकीय कोतवाल नव्हता, तर गावकऱ्यांनी ठेवलेला कोतवाल होता, असे सांगितले जात आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल १५ ते २० सशस्त्र नक्षलवादी रमेश रामटेकेच्या घरी गेले. त्यांनी रमेशला झोपेतून उठवून गावाबाहेर नेले आणि गळा चिरुन त्याची हत्या केली. मागील २१ वर्षांत नक्षल्यांनी केलेली कोतवालाची ही तिसरी हत्या आहे. सर्वप्रथम नक्षल्यांनी ३१ डिसेंबर १९९३ रोजी झिंगानूरचे कोतवाल दुर्गम भाना बक्का यांची हत्या केली होती. त्यानंतर ४ जुलै १९९६ रोजी भामरागडचे कोतवाल केशव भिकाजी पगाडे यांची हत्या केली होती. श्री.पगाडे हेदेखील दलित समाजाचे होते.

तसेच नक्षल्यांनी केलेली ही तिसरी दलित हत्या आहे. यापूर्वी १९ एप्रिल २०१५ रोजी दामरंचाचे उपसरपंच पत्रू बालाजी दुर्गे यांची नक्षल्यांनी हत्या केली होती. त्यावेळी भूमकाल संघटनेने दलित इसमांना नक्षली टार्गेट करीत असल्याबद्दल आवाज उठविला होता. मृत रमेश रामटेके हा एका संघटनेशी संबंधित होता, अशी चर्चा आहे.

गेल्या १० दिवसांत नक्षल्यांनी ५ सामान्य नागरिकांची हत्या केली आहे, तर दोन पोलिस जवानांना शहीद व्हावे लागले आहे. येत्या २ डिसेंबरपासून नक्षल्यांच्या पीपल्स लिबरेशन गुर्रिला आर्मीचा स्थापना सप्ताह आहे. या सप्ताहाच्या आधीच नक्षल्यांनी विघातक कारवाया केल्याने पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
O144B
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना