गुरुवार, 28 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या बस चालकास ४ वर्षांचा सश्रम कारावास

Wednesday, 29th November 2017 06:02:18 AM

गडचिरोली, ता.२९: अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस विशेष सत्र न्यायालयाने ४ वर्षांचा सश्रम कारावास व ३ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. गुरुदीप मिट्टूलाल मजोके, रा. किसाननगर, ता.सावली, जि.चंद्रपूर असे दोषी इसमाचे नाव असून, तो गडचिरोली आगारात बसचालक म्हणून कार्यरत आहे.

सविस्तर वृत्त असे की, १६ ऑगस्ट २०१५ रोजी संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास आरोपी गुरुदीप मजोके हा आपल्या दोन मित्रांसह चांदाळा येथे दारु पिण्यासाठी गेला. चांदाळा येथून तिघेही जण रानमूल येथे गेले. तेथे ते पीडित मुलीच्या घरी गेले. त्यांनी तिला पाणी मागितले. पाणी प्याल्यानंतर गुरुदीपचे दोन मित्र रस्त्यावर आले. मात्र, आरोपी गुरुदीप हा पीडित मुलीच्या घरीच थांबला आणि त्याने तिचा विनयभंग केला. मुलीने ही बाब आपल्या वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी गडचिरोली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी आरोपी गुरुदीप मजोके याच्यावर भादंवि कलम ३५४ अन्वये गुन्हा दाखल केला.

पोलिस उपनिरीक्षक पूनम गोरे यांनी तपास पूर्ण केल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

आज या प्रकरणाचा निकाल लागला. विशेष सत्र न्यायालयाने साक्ष पुरावा तपासून व सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य मानून आरोपी आरोपी गुरुदीप मजोके यास भादंवि कलम ३५४ अन्वये १ वर्षांचा सश्रम कारावास व बालकाचा लैंगिक अत्याचार अधिनियमाच्या कलम ८ अन्वये ३ वर्षांचा सश्रम कारावास व २ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अनिल प्रधान यांनी काम पाहिले.  


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
0E595
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना