शुक्रवार, 29 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

भिकाऱ्याचा खून करणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा

Wednesday, 29th November 2017 05:39:56 AM

गडचिरोली, ता.२९: मोबाईल गायब केल्याच्या संशयावरुन एका भिकाऱ्याचा खून करणाऱ्या आरोपीस येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप व पाचशे रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. शंकर ठेंगरी असे दोषी इसमाचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे की, २६ जुलै २९१५ रोजी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास अब्दूल कादीर सत्तार शेख हे वडसा रेल्वे स्थानकावर बसले असताना शंकर विठोबा ठेंगरी, दादाराव गजभिये व विष्णू साहू हे तिघे जण तेथे गेले. त्यानंतर एक भिकारी दादाराव गजभिये याच्याकडील मोबाईल घेऊन गाणे ऐकल बसला. त्याचवेळी शंकर ठेंगरी याने दुसऱ्या भिकाऱ्याकडील ७ रुपये हिसकावून त्यास काठीने मारहाण केली. त्यानंतर तिघेही नवेगाव येथे दारु ढोसण्यासाठी गेले. दारु पिऊन परत येताना भिकारी मधू हा वडेगाव रेल्वेस्थानकावर भीक मागताना दिसला. तो दिसताच तिघांनीही मोबाईल हरविल्याचा आरोप करुन भिकारी मधू यास बेदम मारहाण केली. नंतर सर्वजण वडसा रेल्वेस्थानकावर आले. तेथे शंकर ठेंगरी याने भिकारी मधू, दादाराव गजभिये व अब्दूल कादर सत्तार शेख यांना मोटारसायकलवर बसवून कासवी फाट्याजवळच्या जंगलात नेले आणि भिकारी मधू यास मोबाईलची मागणी केली. यावर मधूने माझ्याकडे मोबाईल नाही, असे सांगितले. यामुळे संतप्त झालेल्या दादाराव गजभिये व शंकर ठेंगरी यांनी मधूला लोखंडी रॉडने मारहाण केली. मारहाणीमुळे मधू खाली कोसळला. त्यानंतर अब्दूल कादर शेख, दादाराव गजभिये व शंकर ठेंगरी हे वडसा येथे आले. पुढे अब्दूल सत्तार शेख यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून जखमी असलेल्या मधूला दवाखान्यात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक नारायण बच्चलवार व पोलिस निरीक्षक सुभाष ढवळे यांनी तपास पूर्ण केल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

आज या प्रकरणाचा निकाल लागला. जिल्हा व सत्र न्यायालयाने साक्ष पुरावा तपासून व सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य मानून आरोपी शंकर ठेंगरी यास भादंवि कलम ३०२ अन्वये जन्मठेप व पाचशे रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास ३ महिन्यांची अतिरिक्त शिक्षा व दंडाची रक्कम मृतकाच्या नातेवाईकास देण्याचा आदेशही न्यायालयाने पारीत केला. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील सचिन कुंभारे यांनी काम पाहिले.  


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
LU4H6
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना