मंगळवार, 16 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

पुरोगामी शिक्षक समितीचे शरद पवारांना निवेदन

Wednesday, 15th November 2017 11:19:42 PM

गडचिरोली, ता.१६:महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती संघटनेने काल(ता.१५) गडचिरोली येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना शिक्षकांना भेडसावणाऱ्या ज्वलंत समस्यांविषयी चर्चा केली.

समितीचे विभागीय अध्यक्ष राजेश दरेकर यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने शरद पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले. १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करावी, २३ ऑक्टोबर २०१७ च्या शासन निर्णयातील अट क्र. ४ रद्द करावी, सर्व विद्यार्थ्यांना गणवेश द्यावे व त्याविषयीचे अधिकार शालेय व्यवस्थापन समितीला द्यावे, एमएससीआयटीची मुदत मार्च २०१८ पर्यंत वाढविण्यात यावी, शिक्षकांकडील ऑनलाईनची कामे बंद करुन डाटा ऑपरेटरची नियुक्ती करावी, सर्वच उच्च प्राथमिक शाळांना विनाअट मुख्याध्यापक पद मंजूर करावे, सर्व कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर सातवा वेतन आयोग लागू करावा अशा सुमारे १० मागण्यांचे निवेदन श्री.पवार यांना देण्यात आले. पवार यांनी शिक्षकांचे प्रश्न आस्थेने ऐकून घेऊन शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
B2RAS
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना