गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

पोलिसांनी नक्षलग्रस्त गावातील नागरिकांसमवेत साजरी केली दिवाळी

Thursday, 19th October 2017 02:43:33 AM

गडचिरोली,ता.१९: आधीच असलेली गरिबी आणि यंदा निसर्गाने दाखविलेली अवकृपा यामुळे यंदाची दिवाळी अंधकारमय जाईल, या चिंतेने ग्रासलेल्या एका नक्षलग्रस्त गावातील गावकऱ्यांच्या मदतीला पोलिस धावून आले आणि त्यांनी नागरिकांसमवेत दिवाळी साजरी करुन त्यांना प्रकाशाचा किरण दाखविला.

चामोर्शी तालुक्यातील घोट पोलिस मदत केंद्रापासून अंदाजे १० किलोमीटर अंतरावर लसणपेठटोला हे गाव आहे. नक्षलग्रस्त, आदिवासीबहुल व दुर्गम असलेल्या या गावात मुलभूत सुविधांचा अभाव आहे. गावाला जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. ३५ घरे व १५० लोकवस्तीच्या या गावाला पावसाळ्यात जायचे म्हणजे मोठी कसरत करावी लागते. गावात तीन हातपंप आहेत. परंतु तेही नादुरुस्त. त्यामुळे गावकऱ्यांना एकाच विहिरीतील पाण्यावर आपली तहान भागवावी लागते. गावात आरोग्यविषयक कुठलीही सुविधा नाही. त्यामुळे पाच-सहा किलोमीटरवरील येडानूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गावकऱ्यांना उपचारासाठी जावे लागते. असे हे गाव घोट पोलिसांना नक्षल अभियानादरम्यान गवसले. पोलिसांनी गावकऱ्यांशी चर्चा केली असता, तेथे मुलभूत सुविधांचा अभाव असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यंदा कोरड्या दुष्काळामुळे शेतीची दैनावस्था झाल्याचेही गावकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे यंदाची दिवाळी अंधारात जाईल, हे पोलिसांच्या लक्षात आले. 

पोलिस उपनिरीक्षक सुनील जायभाये यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सागर कवडे यांना लसणपेठटोला येथील परिस्थिती सांगितली. लगेच डॉ.कवडे यांनी तेथे दिवाळी साजरी करण्याचा निर्धार केला आणि आज तो दिवस उजाळला.

उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सागर कवडे, घोटचे पोलिस उपनिरीक्षक सुनील जायभाये, पोलिस उपनिरीक्षक विशाल शिंदे हे आपल्या सहकाऱ्यांसह आज सकाळी लसणपेठटोला येथे पोहचले. तेथे त्यांनी गावकऱ्यांना मिठाई व फराळ खाऊ घालून त्यांचे तोंड गोड केले. शिवाय लहान मुलांना कपडे वाटप करुन फटाके फोडण्याचा आंनदही लुटला. यावेळी त्यांनी गावकऱ्यांना भेडसावणाऱ्या सर्व समस्या लिहून शासनदरबारी पाठपुरावा करण्याचे अभिवचन दिले. पोलिसांच्या या कृत्यामुळे लसणपेठटोलावासीयांची अंधकारमय दिवाळी प्रकाशकिरणांनी उजळली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
K4B6Z
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना