गुरुवार, 28 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

जिल्ह्याच्या विकासासाठी ग्रामसभांनी एकत्र यावे:आ.डॉ.देवराव होळी

Sunday, 15th October 2017 06:27:16 AM

गडचिरोली, ता.१५: वेगवेगळ्या ठिकाणच्या ग्रामसभा आपापल्या इलाक्यांमध्ये गाव विकासासाठी चांगले काम करीत आहेत. मात्र, संपूर्ण जिल्ह्याच्या विकासासाठी ग्रामसभांनी 'ग्रामसभांचा महासंघ' या बॅनरखाली एकत्र यावे, असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ.देवराव होळी यांनी केले.

चांदाळा मार्गावरील गोटुल भूमी येथे आयोजित आदिवासी देवदेवतांची महापूजा व ग्रामसभांच्या महामेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी समाजसेवक देवाजी तोफा, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, नगराध्यक्ष योगीता पिपरे, प्रकाश महाराज काटेंगे, आदिवासी सेवक प्रमोद पिपरे, रंगय्या मडावी, सुरेश बारसागडे, यादव कोल्हे, डॉ.सुरेश चौधरी, माधव गोटा, देवाजी पदा, वनवासी कल्याण आश्रमाचे डॉ.सूर्यवंशी, माधव गावडे, शिवाजी नरोटे, नगर परिषद उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, ओबीसी नेते नरेंद्र भांडेकर, वसंत कुलसंगे उपस्थित होते.

यावेळी जिल्हाभरातून आलेल्या ग्रामसभांच्या प्रतिनिधींनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करुन ठराव पारीत केले. त्यात जिल्ह्यातील ग्रामसभांचा एक महासंघ स्थापन करुन त्याचे प्रवर्तक म्हणून देवाजी तोफा यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. श्री.तोफा यांनी सामूहिक वनहक्काबाबत मार्गदर्शन करुन पेसा क्षेत्रातील टोली, वाडी व गावांच्या ग्रामसभांचे सक्षमीकरण कसे करता येईल, याविषयी माहिती दिली. यावेळी सुरेश बारसागडे, डॉ.सूर्यवंशी, माधव गोटा यांनीही मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे संचालन डॉ.सुरेश चौधरी, तर प्रास्ताविक प्रकाश महाराज काटेंगे यांनी केले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
YK001
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना