रविवार, 23 सप्टेंबर 2018
लक्षवेधी :
  शिक्षक बदली घोटाळ्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी सभापती विश्वास भोवते यास अटक, न्यायालयीन कोठडीत रवानगी             कोंबडी चोरुन खाल्ली म्हणून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास ५ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा-जिल्हा व सत्र न्यायालयाचा निवाडा             नक्षल्यांनी कमलापूरच्या मुख्य चौकात बांधले बॅनर, परिसरात दहशत             राष्ट्रीय ओबीसी महासंघाने जाळला ११ सप्टेंबरचा ओबीसींवर अन्याय करणारा जीआर             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
96%
नाही :
4%

पुण्याच्या आदर्श मित्र मंडळाने गडचिरोली जिल्ह्याला दिली टू व्हीलर अॅम्बुलन्स

Sunday, 8th October 2017 08:27:00 AM

गडचिरोली, ता.८: सामाजिक कार्याचा वसा घेतलेल्या पुण्याच्या आदर्श मित्र मंडळाने यंदा गडचिरोली जिल्हावासीयांना दिवाळीची अनोखी भेट दिली आहे. मंडळाने 'टू व्हीलर अॅम्बुलन्स' तयार केली असून, तिचे लोकार्पण आज गडचिरोलीत करण्यात आले.

इंदिरा गांधी चौकातील विश्रामगृहात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर यांच्या हस्ते अॅम्बुलन्सचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी आदर्श मित्र मंडळाचे अध्यक्ष उदय जगताप, बल्लारपूरच्या श्रीलक्ष्मी नृसिंह पतसंस्थेचे श्रीनिवास सुंचूवार, डॉ.अमित साळवे, डॉ.चरणजित सलुजा, आलापल्लीच्या 'उडाण' फाउंडेशनचे रोमित तोंबर्लावार, संतोष मंथनवार, रमन गंजीवार, 'हेल्पिंग हँड्स'चे प्रतीक मुधोळकर, शेखर फुलमाळी, तोंदे मुरा पोटावी उपस्थित होते.

दुर्गम भागात दळणवळणाच्या सुविधा नसलेल्या ठिकाणी टू व्हीलर अॅम्बुलन्समुळे नागरिकांना मोठी मदत मिळेल, असा विश्वास डॉ.शशिकांत शंभरकर यांनी यावेळी व्यक्त केला.

यासंदर्भात आदर्श मित्र मंडळाचे अध्यक्ष उदय जगताप यांनी सांगितले की, दोन वर्षांपूर्वी एटापल्ली तालुक्यातील तुमरगुंडा येथील तोंदे मुरा पोटावी यांच्या संदीप नामक मुलाचा एटापल्लीच्या दवाखान्यात मृत्यू झाला. परंतु रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने तोंदे मुरा पोटावी यांनी संदीपचा मृतदेह आपल्या खांद्यावर घेऊन तब्बल ७ किलोमीटर अंतर गाठले होते. ही बातमी त्यावेळी राज्यभर गाजली होती. संदीपच्या वडिलांवर आलेली पाळी अन्य कुणावर येऊ नये म्हणून स्वर्गीय संदीप तोंदे पोटावी याच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण ही टू व्हीलर अॅम्बुलन्स तयार करुन ती उडाण फाउंडेशनला दिली, असे उदय जगताप यांनी सांगितले.

त्यासाठी पुण्याच्या रोटरी क्लबचे नितीन करंदीकर, अॅड.उदय कुळकर्णी व रमेश पिल्ले यांनी मदत केली. या अॅम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडर, सलाईन बॉटल्स व स्ट्रेचर असणार आहे. ही अॅम्बुलन्स मोटारसायललला लावून रुग्ण व त्याच्या एका नातेवाईकाला कच्च्या रस्त्याने ताबडतोब जवळच्या रुग्णालयात आणता येणे शक्य होईल व त्यामुळे रुग्णाचा जीव वाचेल, असा विश्वास उदय जगताप यांनी व्यक्त केला. या रुग्णवाहिकेत आवश्यकतेनुसार आणखी चांगले बदल करण्यात येतील, असेही श्री.जगताप यांनी स्पष्ट केले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
H1048
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना