गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

मातीच्याच मूर्तींचा वापर करा:जनजागृतीसाठी गडचिरोलीत निघाली रॅली

Thursday, 17th August 2017 05:23:31 AM

गडचिरोली, ता.१७: प्रदूषण टाळून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मातीच्याच मूर्तींची प्रतिष्ठापना करा, असा संदेश देण्यासाठी आज गडचिरोलीत कुंभार समाज, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती व राष्ट्रीय हरित सेनेच्या संयुक्त विद्यमाने रॅली काढून जनजागृती करण्यात आली.

नगराध्यक्ष योगीता पिपरे यांच्या हस्ते रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. या रॅलीत नगरसेवक प्रमोद पिपरे, गुरुदेव सेवा मंडळाचे डॉ.शिवनाथ कुंभारे, लोकनेते नामदेवराव गडपल्लीवार, महाराष्ट्र अनिसंचे जिल्हाध्यक्ष विलास निंबोरकर, उद्धव डांगे, पंडितराव पुडके, देवानंद कामडी, सुरेश मांडवगडे, कुंभार समाजाचे एकनाथ बुरबांधे व अन्य नागरिक उपस्थित होते. शहरातील मुख्य मार्गाने रॅली काढण्यात आली. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पाण्यात विरघळत नाही. त्यामुळे प्रदूषण होऊन मासे व अन्य जलचरांचे नुकसान होते. याअनुषंगाने राज्य शासनाने प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी घातली आहे. त्यामुळे नागरिकांनी मातीच्याच मूर्तीची प्रतिष्ठापना करावी, असे आवाहन अतिथींनी यावेळी केले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
HH9H4
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना