गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

महावितरणचा २७५ वीजचोरांना दणका, ८१ लाखांची वीजचोरी उघडकीस

Monday, 14th August 2017 05:22:16 AM

गडचिरोली, ता.१४: महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळांतर्गत सर्व विभागात १ एप्रिल २०१७ पासून वीजचोरांविरोधात धडक मोहीम सुरू करण्यात आली असून वरोरा, ब्रम्हपुरी, आलापल्ली, गडचिरोली, बल्लारशा व चंद्रपूर विभागात सापडलेल्या वीजचोरींमध्ये वीजचोरांना चांगलाच दणका बसला आहे. आतापर्यंत करण्यात आलेल्या या कारवाई अंतर्गत २७५ वीजचोरांनी ८१ लाख ३२ हजाराची वीजचोरी केल्याचे उघडकीस आले असून, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

चंद्रपूर मंडळातील एकूण १७१ वीजचोरांनी ४ लाख १० हजार ६६ विजेच्या युनिट्सची चोरी केली, तर गडचिरोली मंडळातील १०४  वीज चोरट्यांनी २ लाख ४९ हजार ४३८ विजेच्या युनिट्सची चोरी केली. रकमेचा विचार करता चंद्रपूर जिल्हयातील १७१ वीजचोरांनी ५३ लाख १९ हजारांची, तर गडचिरोली जिल्हयातील १०४ वीजचेारांनी २७ लाख ८६ हजारांची वीजचेारी केल्याचे निष्पन्न झाले. 

विदयुत मीटरमधील सीटी बायपास करणे, सीटीच्या कॉईलची लांबी कमी करणे, मीटरमधे रेजिंस्टंस टाकणे, सर्व्हिस वायर टॅप करणे, पीसीबी डिस्टर्ब करणे, वीजमीटरच्या सर्किटशी छेडछाड करून वीजमीटर संथ करणे आदी सर्व प्रकार वापरून वीजचोरी करण्यात आली. या वीजचोरट्यांकडून वीजचोरीच्या दंडाची रक्कमही वसूल करण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया महावितरणच्या नागपूर पोलिस ठाण्यात सुरू आहे.

महावितरणच्या नागपूर विभागाचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांच्या निर्देशानुसार, चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता  दिलीप घुगल, चंद्रपूर  मंडळाचे अधीक्षक अभियंता हरीश गजबे व गडचिरोली मंडळाचे अधीक्षक अभियंता अशोक म्हस्के, गडचिरोली विभागाचे कार्यकारी अभियंता विजय मेश्राम, ब्रम्हपुरी विभागाचे कार्यकारी अभियंता युवराज मेश्राम, आलापल्ली विभागाचे कार्यकारी अभियंता अमित परांजपे, चंद्रपूर विभागाचे कार्यकारी अभियंता अविनाश कुरेकार, बल्लारशा विभागाचे कार्यकारी अभियंता किशोर पिजदूरकर व वरोरा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशां राठी यांनी वीजचोरी पकडण्याची कारवाई त्यांच्या सहकाऱ्यांसोबत पार पाडली.

एकाच दिवशी २० लाख ६७ हजारांची वीजचोरी उघडकीस 

१० ऑगस्ट २०१७ रोजी महावितरणद्वारा वीजचोरी विरोधात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत २० लाखांच्या ६७  वीजचोऱ्या उघडकीस आल्या. विजेचा वापर मोठा, परंतु तुलनेने वीजबिल मात्र कमी. अनेक ठिकाणी वीजवापराच्या प्रमाणात वीजबिल हे केल्या गेलेल्या वीजचोरीमुळे कमी येत असते. अशा संशयित ठिकाणी महावितरणने ही विशेष मोहीम राबवली. 

वीजचोरांविरोधात ही मोहीम अशीच सुरू राहणार असून, चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी वीजग्राहकांना वीजचोरीपासून प्रवृत्त होण्याचे व कायदेशीर मार्गाने वीज वापरण्याचे तसेच वीजबिल वेळेवर भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. 

                                                                 

                                                                  


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
021O2
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना