मंगळवार, 11 डिसेंबर 2018
लक्षवेधी :
  ब्रम्हपुरी नगर परिषदेत काँग्रेसची एकहाती सत्ता, नगराध्यक्ष रिता उराडे यांच्यासह काँग्रेसचे ११ सदस्य विजयी, अशोक भैया यांच्या आघाडीला ५, तर भाजपला ३ जागा             नक्षल्यांनी केली इसमाची हत्या-कुरखेडा तालुक्यातील खोब्रामेंढा येथील घटना             तेली समाजातील मुलांनी उच्च शिक्षण घ्यावे- संत जगनाडे महाराज जयंती कार्यक्रमात प्रा.देवानंद कामडी यांचे आवाहन             गडचिरोली येथील क्रिकेट सामन्यात पत्रकारसंघाची व्यापारीसंघावर १२ धावांनी मात             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
95%
नाही :
5%

नाल्यात बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

Tuesday, 16th September 2014 02:20:03 PM

 
गडचिरोली,ता़१६
मासे पकडण्यासाठी गेलेल्या दहावीतील दोन विद्यार्थ्यांचा तोल गेल्याने त्यांचा नाल्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास सिरोंचा येथे घडली. मोहम्मद रजा खान (१६) व इतियाज इस्माईल शेख (१५) दोघेही रा. सिरोंचा अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत.

मृत विद्यार्थी आपल्या अन्य दोन मित्रासह आज दुपारच्या सुमारास सिरोंचापासून दीड किमी अंतरावरील मादाराम नाल्यावर मासे पकडण्यासाठी गेले होते. मासे पकडण्याच्या नादात मोहम्मद व इतियाज या दोघांचा तोल गेल्याने ते नाल्यात पडले. नाल्यात पाणी जास्त असल्याने दोघेही गटांगळ्या खाऊ लागले. या प्रकारामुळे अन्य दोघे घाबरुन गावात आले व त्यांनी घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. यामुळे काही नागरिकांनी मादाराम नाल्याकडे धाव घेतली. परंतु नागरिक पोहोचेपर्यंतत्या दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. या घटनेमुळे सिरोंचा येथे शोककळा पसरली आहे. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
G5OO4
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना