मंगळवार, 11 डिसेंबर 2018
लक्षवेधी :
  ब्रम्हपुरी नगर परिषदेत काँग्रेसची एकहाती सत्ता, नगराध्यक्ष रिता उराडे यांच्यासह काँग्रेसचे ११ सदस्य विजयी, अशोक भैया यांच्या आघाडीला ५, तर भाजपला ३ जागा             नक्षल्यांनी केली इसमाची हत्या-कुरखेडा तालुक्यातील खोब्रामेंढा येथील घटना             तेली समाजातील मुलांनी उच्च शिक्षण घ्यावे- संत जगनाडे महाराज जयंती कार्यक्रमात प्रा.देवानंद कामडी यांचे आवाहन             गडचिरोली येथील क्रिकेट सामन्यात पत्रकारसंघाची व्यापारीसंघावर १२ धावांनी मात             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
95%
नाही :
5%

येरकडच्या स्फोटात क्लेमोर माईन्सचा वापर

Tuesday, 16th September 2014 08:48:23 AM

 
गडचिरोली, ता़१६
नक्षल्यांनी सोमवारी १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुुमारास धानोरा तालुक्यातील येरकड येथे केलेल्या स्फोटात १ जवान शहीद तर ४ जवान जखमी झाले होते़ हा स्फोट क्लेमोर माईन्सचा असल्याचे उघड झाले असून, तो अवघ्या शंभर मीटर अंतरावरून करण्यात आला आहे़

धानोरा तालुक्यातील येरकड येथील आठवडी बाजाराकडे १८ पोलिसांचे एक पथक गस्त घालण्यासाठी जात असताना नक्षल्यांनी स्फोट घडवून आणला यात चेतन साळवे, नीतेश भांडेकर, सुभाष समर्थ व माणिक मानकर यांच्यासह आणखी एक जवान जखमी झाला होता़ त्यांना हेलिकॉप्टरने नागपूरला हलविण्यात आले़ मात्र, चेतन साळवे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़

जवान येरकडच्या दिशेने पायी मुख्य रस्त्याच्या डाव्या बाजून पायी येत होते़ या रस्त्याच्या कडेला झुडपे असून, पलिकडे आणखी एक रस्ता आहे़ तेथे खोलगट भागातील झुडपामध्ये दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी स्फोट घडवून आणला़ हा स्फोट क्लेमोर माईन्सचा असून, तो जमिनीवर कुठेही लावू शकतात, असे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी स्पष्ट केले़ परिसरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली़


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
29KR6
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना