गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करु पाहणाऱ्या आरोपीस ७ वर्षांचा सश्रम कारावास

Tuesday, 20th June 2017 05:26:35 AM

 

गडचिरोली, ता.२०: अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस येथील सत्र न्यायालयाने ७ वर्षांचा सश्रम कारावास व ३ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. बंडू भदूजी गोडबोले(५०) रा. भेंडाळा, ता.चामोर्शी असे दोषी इसमाचे नाव आहे.

ही घटना १४ मार्च २०१६ ची आहे. या दिवशी पीडित ६ वर्षीय मुलगी खेळत असताना आरोपी बंडू गोडबोले याने तिला घरी बोलावून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलीच्या ओरडण्याचा आवाज येताच तिचा भाऊ व त्याच्या मित्राने घरी जाऊन पाहिले असता आरोपी बंडू गोडबोले हा तिच्यावर अतिप्रसंग करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून आले. यावेळी पीडित मुलीचा भाऊ व त्याच्या मित्रास पाहून आरोपी बंडू गोडबोले याने पळ काढला. पीडित मुलीची आई घरी आल्यानंतर तिने व तिच्या भावाने तिला हकीकत सांगितली. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने दुसऱ्या दिवशी चामोर्शी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी बंडू गोडबोलेवर भादंवि कलम ३५४(ब) व बालकांवरील लैंगिक अत्याचार कायद्याच्या कलम ८, १२ अन्वये गुन्हा दाखल करुन त्याला त्याच दिवशी अटक केली. पोलिस उपनिरीक्षक प्रशांत कंडारे यांनी तपास पूर्ण करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

आज या प्रकरणाचा निकाल लागला. जिल्हा व सत्र न्यायालयाने साक्षदारांचे बयाण नोंदवून, पीडित मुलगी, तिचा भाऊ व त्याच्या मित्राची साक्ष अत्यंत प्रभावीपणे ग्राह्य धरुन व सरकारी पक्षाचा युक्तीवाद मान्य करुन आरोपी बंडू गोडबोले यास ७ वर्षांचा सश्रम कारावास व ३ हजाराचा दंडाची शिक्षा ठोठावली.

सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अनिल प्रधान यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलिस उपनिरीक्षक जयेश खंदरकर यांनी जबाबदारी सांभाळली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
65K9O
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना