गुरुवार, 28 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

आयपीएलवरील सट्टा-गडचिरोलीच्या अंकित हेमकेला अटक

Tuesday, 25th April 2017 08:17:01 AM

 

गडचिरोली, ता.२५: आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा घेणाऱ्या अंकित हेमके(३४) यास पोलिसांनी काल(ता.२४)अटक केली. त्याच्याकडून काही इलेक्ट्रॉनिक साहित्य व मोठी रोकड असा १ लाख ५५ हजार ७० रुपयांचा ऐवज आणि देशी व विदेशी दारुही जप्त करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यास एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, गडचिरोली येथील वंजारी मोहल्ल्यातील गांधी चौकात राहणारा अंकित हेमके हा आपल्या राहत्या घरी आयपीएल क्रिकेट मॅचवर लोकांकडून सट्टा घेतो, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह अंकित हेमकेच्या घरी काल धाड टाकली. यावेळी त्याच्याकडे एक व्हीडीओकॉन टीव्ही संच, ६ मोबाईल व १ लाख ४१ हजार ६७० रुपये रोख आढळून आले. तसेच आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या बूकीचे पैशाची देवाणघेवाण करण्याचे नोंद रजिस्टर आणि डायऱ्या असा एकूण १ लाख ५५ हजार ७० हजार रुपयांचा ऐवज, तसेच मॅक्डोवल कंपनीच्या विदेशी दारुचा एक बंपर, ५००० हायवर्ड कंपनीच्या बिअरच्या ५०० मिलिलीटरच्या ८ कॅन, देशी दारुच्या ९० मिलिलीटरच्या ६ निपा अशी एकूण २१६० रुपयांची दारुही जप्त करण्यात आली आहे. जुगारचे साहित्य, रोकड व दारुची एकूण किंमत १ लाख ५७ हजार २३० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सागर कवडे यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक सतीश सिरसाठ, हवालदार राजेंद्र तितिरमारे, विजय राऊत, दीपक डोंगरे, साईनाथ उडाण, रंगूवार आदींनी ही कारवाई केली.

आज अंकित हेमके यास गडचिरोली येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यास एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.अंकित हेमके हा गेल्या काही वर्षांपासून दरवर्षी आयपीएल सामन्यांवर सट्टा घेत होता. स्वत:च्या बूकडेपोतूनच त्याचा हा कारभार चालायचा. आयपीएल सट्ट्यामुळे दोन वर्षांपूर्वी एका युवकानेही कर्जबाजारी होऊन आत्महत्या केली होती. तरीही पोलिस कानाडोळा करीत होते. मात्र, उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी यंदा अंकित हेमके यास गजाआड केल्याने अनेक बडे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
EKID9
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना