गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

५८ जणांनी केली १० लाखांची वीजचोरी

Tuesday, 25th April 2017 02:03:58 AM

 

गडचिरोली, ता.२५: महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळांतर्गत सर्व विभागात १ एप्रिल २०१७ पासून वीजचोरांविरोधात धडक मोहीम सुरू करण्यात आली असून, या मोहिमेदरम्यान ५८ वीजचोरांनी १० लाख रुपयांची वीजचोरी केल्याचे उघडकीस आले आहे. यातील सर्वाधिक ४० वीजचोरी ब्रम्हपुरी विभागातील आहेत.

१ एप्रिल ते २४ एप्रिलपर्यंत महावितरणने राबविलेल्या मोहिमेदरम्यान ब्रम्हपुरी विभागात ४० वीजचोरी आढळल्या. यात वीजमीटरशी छेडछाड करून १० ग्राहकांनी, तर आकोडे टाकून २३ जणांनी वीजचोरी केल्याचे आढळले. सात ग्राहक सर्व्हीस वायर टॅप करून परस्पर वीजचोरी करतानाही सापडले आहेत. या सर्व ४० वीजचोरांनी ५ लाख ८८ हजार ९३० रूपयांची तसेच १ लाख २ हजार ६०९ युनिट्ची वीज चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. या सर्व वीजचोरांविरूध्द वीजकायदा २००३ च्या कलम १३५ अन्वये कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून वीजचोरीचे ५ लाख ५८ हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत.

वरोरा विभागाने पकडेलेल्या ५ वीजचोरींमध्ये वीजचोरांनी मीटरमध्ये एक्स-रे पट्टी टाकून मीटर थांबविणे, मीटरमध्ये रिमोट किट बसवून रिमोटने वीजचोरी करणे तसेच मीटर बायपास करण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. या वीजचोरांनी १२ हजार १५७ युनिट्सची वीजचोरी करुन १ लाख ४९ हजार ७७५ रूपयांची वीजचोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे. आलापल्ली विभागाने १ लाख ३५ हजाराच्या ९ वीजचोरी पकडल्या आहेत, तर चंद्रपूर विभागाने राबविलेल्या धडक वीज मीटर तपासणी मोहिमेंतर्गत मीटर सोबत छेडछाड करून वीज चोरी करणाऱ्या ४ ग्राहकांना दणका बसला आहे. त्यांनी ७४९०0 युनिटची वीज चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. वीज चोरीपोटी यांच्याकडून १ लाख २८ हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत.

चंद्रपूर  मंडळाचे अधीक्षक अभियंता हरीश गजबे व गडचिरोली मंडळाचे अधीक्षक अभियंता अशोक म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रम्हपुरी विभागाचे कार्यकारी अभियंता युवराज मेश्राम, आलापल्ली विभागाचे कार्यकारी अभियंता अमित परांजपे, चंद्रपूर विभागाचे कार्यकारी अभियंता अविनाश कुरेकार व वरोरा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांनी वीजचोरी पकडण्याची कारवाई त्यांच्या सहकाऱ्यांसह पार पाडली. 

चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी वीजग्राहकांना वीजचोरीपासून प्रवृत्त होण्याचे, कायदेशीर मार्गाने वीज वापरण्याचे तसेच वीज बिल वेळेवर भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
WP09H
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना