गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णवाहिका कुचकामी, रुग्णांची गैरसोय

Friday, 15th August 2014 08:33:22 PM

 
गडचिरोली, ता़१६
गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना पोहचवून देण्यासाठी सेवेत असलेल्या रुग्णवाहिका डिझेलअभावी बंद असल्याने प्रसूतीच्या व अन्य गंभीर आजाराच्या रुग्णांची प्रचंड गैरसोय होत असल्याचा संतापजनक प्रकार स्वातंत्र्यदिनी (ता. १५) उघडकीस आला़ ही बाब लक्षात येताच युवा शक्ती संघटनेच्या पदाधिकाºयांनी आपल्या रुग्णवाहिका बोलावून रुग्णांना त्यांच्या स्वगावी पोहचवून दिले़
गडचिरोली येथे जिल्हा सामान्य रुग्णालय असल्याने गडचिरोली जिल्ह्यासह चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील रुग्णही येथे मोठ्या प्रमाणावर उपचारासाठी येत असतात़ येथे आल्यास आपणावर योग्य उपचार होऊन चांगली सेवा मिळेल, अशी बहुतेक जणांना आशा असते़ परंतु रुग्णांचा अनुभव मात्र चांगला नाही़ या रुग्णालयात एक्स रे, सीटीस्कॅन मशिन अनेक वेळा बंद असतात़ बहुतेकदा वेगवेगळी कारणे सांगून रुग्णवाहिकाच उपलब्ध करून दिल्या जात नाही़ त्यामुळे गोरगरीब रुग्णांना स्वखर्चाने खासगी रुग्णवाहिकांचा वापर करावा लागतो़
प्रसूती झालेल्या काही महिलांची स्वातंत्र्यदिनी रुग्णालयातून सुटी झाली़ परंतु त्यांना स्वगावी नेऊन देण्यासाठी एकही रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येत नव्हती़ ही बाब लक्षात येताच युवा शक्ती संघटनेचे उपजिल्हाप्रमुख व नगरसेवक प्रा़राजेश कात्रटवार, आनंद शृंगारपवार, प्रा़ रमेश चौधरी, शिक्षण सभापती सचिन बोबाटे, नगरसेवक अ‍ॅड़नितीन कामडी आदींनी रुग्णालयात धाव घेतली़ तेथे जिल्हा शल्य चिकित्सक उपस्थित नव्हते़ त्यानंतर त्यांनी काही डॉक्टरांशी संपर्क साधला़ परंतु त्यांनी हात वर केले़ अधिक चौकशी केली असता, रुग्णवाहिका चालविण्यासाठी आवश्यक असलेले डिझेल खरेदी करण्याकरिता निधी नसल्याने रुग्णवाहिका बंद असल्याचे अफलातून कारण सांगण्यात आले़ त्यानंतर युवा शक्ती संघटनेच्या पदाधिकाºयांनी युवा शक्ती संघटना, बेलदार समाज संघटना, नगर परिषद व अन्य संघटनांच्या मालकीच्या रुग्णवाहिका बोलावून रुग्णांना त्यांच्या स्वगावी पोहचवून दिले़ या रुग्णांमध्ये मुलचेरा, आरमोरी, चामोर्शी व अन्य ठिकाणच्या दुर्गम भागातील गरीब रुग्णांचा समावेश होता़ युवा शक्ती संघटनेचे पदाधिकारी वेळेवर पोहचल्याने रुग्णांनी त्यांना धन्यवाद दिले़ 
जिल्हा सामान्य रुग्णालयातील यंत्रणा कुचकामी असून, रुग्णांना अडचण आल्यास त्यांनी प्रा़ राजेश कात्रटवार, आनंद शृंगारपवार, प्रा़ रमेश चौधरी, भूपेश कुळमेथे, दीपक मडके यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले़


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
2WN44
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना