गुरुवार, 28 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

प्राचार्याच्या आत्महत्येप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

Wednesday, 13th August 2014 11:16:35 PM

 
गडचिरोली, ता़१४
देसाईगंज येथील अनिकेत समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत चेपटू उर्फ सी़सी़ गजभिये यांच्या आत्महत्येप्रकरणी देसाईगंज पोलिसांनी बुधवारी(ता.१३) संध्याकाळी दोन व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे़ मीना चहांदे व नरेश वैद्य अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे असून, दोघेही अनिकेत समाजकार्य महाविद्यालयात कर्मचारी आहेत़
प्राचार्य चंद्रकांत  गजभिये  अनेक वर्षांपासून अनिकेत समाजकार्य महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत होते़ ६ आॅगस्टच्या  सायंकाळी त्यांनी वैनगंगा नदी घाटालगतच्या हेटी बंगला शिवारातील रेल्वे पुलालगत असलेल्या कडुलिंबाच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. त्यावेळी त्यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली़ त्यातील मजकुरानुसार प्राचार्य गजभिये यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात होता़ पोलिसांनी प्राचार्य गजभिये यांची पत्नी व अन्य काही जणांचे बयाण नोंदवून तपास केला़ त्यानंतर बुधवारी रात्री मीना चहांदे व नरेश वैद्य यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली़


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
607W4
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना