गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

५ वर्षांत ९३ हजार मतदारांची वाढ

Wednesday, 3rd September 2014 11:35:30 PM

 

 
गडचिरोली, ता़९ 
२००९ मध्ये विधानसभा निवडणूक झाल्यानंतर पाच वर्षांत गडचिरोली जिल्ह्यात ९३ हजार ६२६ मतदारांची वाढ झाल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री़ रणजितकुमार यांनी आज(ता. १३) पत्रकार परिषदेत दिली़
श्री़ रणजितकुमार यांनी सांगितले की, २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी जिल्ह्यातील गडचिरोली, अहेरी व आरमोरी विधानसभा क्षेत्रात ६ लाख ३४ हजार ४९० मतदार होते़ मात्र, यंदा लोकसभा निवडणूक झाल्यानंतर ३१ जुलै रोजी प्रसिद्ध मतदार यादीनुसार जिल्ह्यात ७ लाख २८ हजार ११६ मतदार झाले आहेत़ पाच वर्षांपूर्वी जिल्ह्यात ३ लाख २३ हजार ५०७ पुरुष, तर ३ लाख १० हजार ९८३ महिला मतदार होत्या़ मात्र, आता पुरुष मतदारांचा  आकडा ३ लाख ७४ हजार ७३८ वर पोहचला असून, मतदारसंख्येत वाढ झाली आहे़ महिला मतदारांच्या संख्येतही भ्रर पडली असून, आता  ३ लाख ५३ हजार ३७८ महिला मतदान करणार आहेत़
यंदा लोकसभा निवडणूक झाल्यापासून पाच महिन्यांत १३ हजार ७७३ मतदार वाढले आहेत़ निवडणूक विभागाने मतदार नोंदणीचा कार्यक्रम सुरूच ठेवल्याने ही वाढ झाली आहे़ येत्या काही दिवसांत आचारसंहिता लागणार असून, निवडणूक जाहीर झाल्यापासून पहिल्या रविवारी मतदार नोंदणीची मोहीम हाती घेण्यात येणार असून, उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या १० दिवस आधीपर्यंत मतदारांना मतदारयादीत नाव नोंदविता येईल, असेही जिल्हाधिकाºयांनी स्पष्ट केले़
नागरिकांनी मतदारयादीत नाव असल्याची खात्री करून घ्यावी़ नाव नसल्यास तहसील कार्यालयाशी संपर्क साधून नाव नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन श्री़ रणजितकुमार यांनी केले़ २००९ च्या तुलनेत स्त्रियांच्या मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली असून, महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदारयादीत नाव नोंदवावे, असे आवाहनही त्यांनी केले़ पत्रकार परिषदेला निवडणूक अधिकारी श्री़ चौधरी उपस्थित होते़
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
कॅप्शन: पत्रकार परिषदेत माहिती देताना जिल्हाधिकारी श्री़रणजितकुमार


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
7U48A
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना